मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात

५० फक्त · · जनातलं, मनातलं
१७ एप्रिल,रात्रीचे साडेसात वाजलेले, पुण्याच्या हद्दीबाहेर थोड्याश्या सुनसान रस्त्याच्या बाजुला एका मोठ्या इमारतीसमोर दोन धिप्पाड तरुण थोड्याश्या अंधारात उभे. समोरुन एक गाडी येते, कर्र्र्र्र्र ब्रेक दाबुन बंद पडते, एक दोन वेळा सुरु होते पुन्हा बंद पडते, त्या दोन्ही तरुणांच्या चेह-यावर हसु येतं, त्यांचे हात खिशात जातात, पुढ्च्याच क्षणी बाहेर येतात, तेवढ्यात गाडी पुढं जाते, त्या तरुणांचे हात पुन्हा खिशात. ते परत अंधारात सरकतात. गाडी थोडी पुढं जाउन पुन्हा त्या तरुणांच्या दिशेने येते, पुन्हा कर्र्र्र्र्र्र ब्रेकचा तोच आवाज पण यावेळी गाडितुन दोघं जण खाली उतरतात, त्या तरुणांच्या दिशेनं जायला लागतात. आता सगळेच जरा उजेडात आलेत, गाडी पुढं निघुन जाते आणि जोरात आवाज घुमतो, ’या प्यारे या, तुम्हाला भेटायला आम्ही खुप उतसुक आहोत’ अण तु काय गाडीची स्ट्रेस टेस्ट घेतो काय रे, उचलत णाय काय गाडी लगेच?’ एवढे दणदणीत ण्कराने 'सरुटॉबाने' कट्टा चालु झाला. पण कुणाला माहितच नव्हतं, म्रुत्युंजय आधीच सरुटॉला पोहोचले होते, त्यांचा फोन आला ’अरे येता का वर नाहीतर समोरच्या २ चेअर टेबलवर पोरगी एकटीच आहे, मी जातो तिथं बसायला. काय आहे अडचणीत सापडलेल्या मदत करावी’ ही सुचना वजा धमकी अधिक ऐकुन आम्ही खाली जमलेले सदस्य ती एकटी पोरगी कोण हे पाहायला पटकन वर गेलो, काय आहे म्रुत्युंजय या नामाशी संबंध असलेली माणसं मुळात असतातच रसिक,पुन्हा एकदम कट्ट्याचं केळवण नको व्हायला. तिथल्या सरदारजींना नाव सांगुन आमचं टेबल हुडकायला जाम वेळ लागला, एक तर टेबल लांब आणि चौतरफा हुच्च्भ्रु लोकं बसलेली,त्या सरदारजी कडं कोण लक्ष देणार. पण शेवटी आलं आमचं टेबल, सगळ्यांनी बसुन घेतलं,९ जण हजर होते, टारझन,प्यारे१,वल्ली,आत्मशुन्य,मनराव,गणेशा,म्रुत्युंजय, साधासुधासौरभ आणि मी ५० फक्त. शुभशकुन झाला, ठाणे कट्टयाचे यशस्वी आयोजक श्री. स्पा(गमोगो) यांचा फोन आला, फोन टारझनकडे देउन मी खाली कॅमेरासाठी येताना उदवाहनातच पुणेरी पेशवे भेटले, पुन्हा वर येउन बसलो तो बानेच्या कॅप्टनने उपयुक्त माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला होता, तो संपता संपता वपाडाव यांचे आगमन झाले. आजुबाजुच्या चमकधमकचा त्याच्यावर एवढा परिणाम झाला होता की आम्ही नाही म्हणलं असतं तर त्याला जाम बरं वाटलं असतं दुसरं एखादं टेबल पकडायला. तशी त्याला मिळालेली जागा छानच होती. छान गार वारं त्याबरोबर येणारा काय तो चार्ली का यार्डलीचा हुच्च्भ्रु सुगंध. Image removed. मनराव, गणेशा, साधासुधा सॉरभ आणि वपाडाव Image removed. टारझन आणि आत्मशुन्य Image removed. ५० फक्त आणि प्यारे १ Image removed. पुपे, वल्ली, म्रुत्यंजय आणि ५० फक्त बरेच जण पहिल्यांदाच भेटत असल्याने ओळखी करुन दिल्या गेल्या आणि मग झेंडा व त्याच्या पोझिशन व त्याचे अर्थ यावर एक अम्बळ प्रेमळ चर्चा करण्यात आली. संदर्भ डॉ. दिवटेंचे लेख ते गुर्जीचे क्रिप्टिक लेखन, सगळॆ. एकुण काय झेंडा ताठ उभा ठेवलेला आहे तोपर्यंतच खायला मिळणार आहे हे वैश्विक सत्य सगळ्यांना पुन्हा एकदा समजलं. तोवर व्हेज आणि नॉनव्हेज याची मोजणी करुन वेटरचा गोंधळ वाढवण्यात आला होताच. आणि तेवढ्यात ज्यासाठी इथं कट्टा केला ती गोष्ट आली, गरम गरम लाल बुंद कोळसा घातलेल्या शेगड्या म्हणजे शुद्ध मराठीत ग्रिल किंवा बार्बेक्यु. हे ग्रिल / बार्बेक्यु प्रत्येक टेबलवर लावुन झाले, थोडा वेळ नुसतंच त्या पेटलेल्या कोळशाकडं पाहात, काही तेवढ्याच गरमागरम विषयांवर गरम चर्चा करण्यात आल्या. या चर्चा पार या कट्ट्याच्या धाग्याचे ट्यार्पी कोण वाढवणार, बाजीराव पेशवे आणि पुपे यांच्यातील साम्य (भिकबाळी सोडुन), वपाडाव म्हणजे काय आणि एका कविशिवाय दुसरा कवि म्हणजे प्रकाशाशिवाय गणेशचंद्र इथंपर्यंत चर्चा झाल्या. तोपर्यंत वेटरने केज्यु/कजुन स्पाईस क्रिस्पि पोटॅटो*, दोन प्रकारचे व्हेज कबाब तर नॉनव्हेज मध्ये तंदुरी चिकन अरे स्टार्टर सर्व्ह करायला सुरुवात केली. त्यानंतर एका एका ग्रिलवर विविध स्टार्टर आणुन ठेवायला लागला. व्हेज मध्ये पनीर मलई, पनीर कबाब, स्पाईस कॉर्न,बेबी मशरुम, पाईनापल वुईथ मॅंगो सॉस व इतर फिलर टाईपचे कबाब स्टिकवर आणुन ठेवायला सुरुवात केली. Image removed. मशरुम, पायनॅपल आणि शेवटी मासा. Image removed. पायनॅपल मॅरिनेटेड इन मँगो सॉस Image removed. तर नॉनव्हेज मध्ये चिकन,प्रॉन्स, दोन प्रकारचे मासे असे आयटम होते. Image removed. मासे, चिकन, स्पाईस कॉर्न याच्या एक दोन राउंडनंतर गविंनी इशारा दिल्याप्रमाणे उगाचच भरताड न भरता सगळ्यांनीच आवडलेल्या आयटम वर लक्ष ठेवुन त्या त्या स्टिक उचलायची चपळाई दाखवायला सुरुवात केली. मग नंतर या सगळ्यांवर तिथं असलेली विविध बार्बेक्यु तेलं आणि चटण्यांचे प्रयोग सुरु केले गेले. Image removed. मस्टर्ड / लेमन / बहुधा ऑलिव्ह ऑइल Image removed. मँगो सॉस / तिखट चटणी / मायोनीज सॉस - टारझन फेव्हरिट Image removed. साधासुधा सॉरभला पडलेला साधासुधा प्रश्न काय घेउ आता व्हेज की नॉन व्हेज, हातानं की काट्यानं ? Image removed. झेंडे अजुन वरच आहेत, शो विल गो ऑन , Image removed. रिकाम्या डिशा, भरलेली पोटं आणि समाधानी चेहरे - याच साठी केला होता अट्हास आणि कट्टा. Image removed. तिळवाला आत्मशुन्य आणि सदा हसतमुख मनराव. अधुन मधुन वेटर केस्पाक्रिपो* घेउन येतच होता पण माझ्यापासुन सुरुवात करुन प्यारे, टारझन, आत्मशुन्य यांच्यानंतर ते पोहोचतच नाहित अशी परिस्थिती झाली. त्यात सॉरभ व गणेशा हे एका बाजुला नॉनव्हेजचा किल्ला टारझनच्या साथित लढवत होते. व्हेज मध्ये केस्पाक्रिपो*, पायनापल वुइथ मॅंगो सॉस, बेबी मशरुम व स्पाइस कॉर्न हे स्टार्टस मस्त होते, नॉन व्हेज बद्दल मंड्ळी खाली प्रतिसादात लिहितीलच. साधारण आठ ते साडेनवापर्यंत हा कार्यक्रम अखंड चालु होता, खाल्लेलं जिरवण्याकरता एक दोघांनी आजुबाजुला चकरा मारुन घेतल्या. जेंव्हा काही लोकं लवकर आलीच नाहीत तेंव्हा जाउन बघता लक्षात आलं की दोन इशान्यभारतीय कन्यका खांदेपट्टयाला अडकवलेले फ्रॉक घालुन गाणि म्हणत होत्या, या ठिकाणि त्यांच्या बहुतेक कुणालाच न कळेल अशा गाण्याचे कौतुक करण्याचे कारण गणेशा व मनराव यांना विचारले असता, पुर्वांचलातुन आपण इंचाइंचाने घेत असलेली माघार सुधारण्यासाठी अश्या प्रकारचे सांस्क्रुतिक बंध निर्माण केले गेले पाहिजेत असा समाजोपयोगी उद्देश सर्वांना समजाउन दिला. या तरुण पिढीचे हे आदर्श आचरण पाहुन डोळे पाणावले, (खरंतर ते शेगडीच्या धुरानं पाणावले होते). असो. Image removed. मागं लांबवर आहेत त्या चार्ली आणि यार्डलीच्या चालत्या बोलत्या खाणी, कळालं वपाडाव एवढ्या कोप-यात का बसला होता ते. Image removed. अशी तब्येतदार खाणारी माणसं हवीत इथं यायला. तसेच मनराव यांच्या बाईकवर पुणे ते कन्याकुमारी ह्या प्रवासावर मुख्य चर्चेत मुंबई पुणे जुना हायवे बरा की नवा महाग अशी पण चर्चा करुन झाली. दोन आनंदाच्या घोषणा केल्या गेल्या, श्री. मनराव यांनी बुलेट क्लासिक ३५० ही गाडी बुक केली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच श्री.प्यारे१ यांच्या मुलीच्या बारश्याचा कार्यक्रम येत्या रविवारी २४ तारखेला क्षेत्र वाई येथे होणार आहे, त्या कार्यक्रमाचे त्यांनी सर्वांना सस्नेह आमंत्रण दिले आहे. बाप झाल्याबद्दल प्यारे१ यांचे अभिनंदन. पुपे व टारझन यांना लवकर निघायचे असल्याने त्यावेळी सर्वांनी केलेल्या आग्रहामुळे व इभाकन्यकांच्या गाण्याने प्रभावित झाल्याने स्थळाच्या जवळच असलेल्या डेझर्ट कडे सर्वांनी आपला मोर्चा वळविला. एक-दोन मिनिटातच आमंत्रणाच्या धाग्यावर अनुभवी लोकांनी दिलेला सल्ला, स्टार्टर व डेझर्ट बास. हा किती मोलाचा आहे हे लक्षात आले. मेन कोर्स फक्त प्यारे१, सॉरभ व वपाडाव यांनीच घेतला असावा. डेझर्ट मधील अंगुरी गुलाबजामुन, बटरस्कॉच पेस्ट्री, फिरनी , ऑरेंज मुस, मड केक, फ्रुट पुडिंग,विविध फ्रुट सॉसेजेस, यावरच सर्वजण तुटुन पडले. मी त्यातल्या त्यात अंगुरी गुलाबजामुन हा एकच आयटम डोळ्यासमोर आणि डिशमध्ये ठेवला होता. गरम गरम गुलाबजामुन व जोडीला फिरनी, फक्त तिथं १० मजल्यावर गार वा-यात झोपायची सोय व घरची परवानगी या दोनच गोष्टींची कमतरता होती. बाकी गोडाबद्दल पट्टीचे गोडखाउ सदस्य लिहितीलच. Image removed. Image removed. आम्ही कट्टेकरी - साधासुधा सॉरभ, आत्मशुन्य, वल्ली, वपाडाव, गणेशा, ५० फक्त, प्यारे१, म्रुत्युंजय आणि मनराव. साधारण सव्वा अकरा वाजता, सगळ्या चर्चा संपवुन आणि बिल भागवुन फोटो काढुन आम्ही खाली उतरलो. पुन्हा एकदा सयाजीच्या बाहेर येणा-या जाणा-या पोरी व महागामोलाच्या गाड्या पाहात पाहात चर्चा झाल्या आणि पुढच्या महिन्यात राजमाची किंवा एक दिवस मुळशी असा फिरायचा बेत ठरवुन आम्ही परत निघालो. हा व्रुतांत टाकुन मी फक्त सुरुवात केली आहे, बाकी कट्ट्याला हजर सदस्यांनी यात भर घालावी तरच या कट्ट्याची साठा उत्तरी कहाणी सुफळ संपुर्ण होईल. माझ्यासाठी या वर्षातले आतापर्यंतच्या चारही महिन्यातला एक दिवस मिपाकरांच्या सोबतीत खुप खुप सुखाचा गेला आहे त्यामुळं माझ्यासाठी ही या वर्षीच्या १२ उत्तरांची कहाणी ४ उत्तरी सुफळ सुखद संपुर्ण आहे. ५० फक्त.

वाचन 17714 प्रतिक्रिया 0