मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुरणपोळी होळी स्पेश्यल :)

सानिकास्वप्निल · · पाककृती
मीली ने पुरणपोळी ची पा़कृ दिली आहे तरी सण म्हणून मीसुद्धा पुरणपोळी ची पा़कृ देत आहे. घरोघरी सगळ्यांची आवडती पुरणपोळी :) सावधान!! डाएट सांभाळणारी मंडळी कृपया गुळ किती, साखर किती, तुप किती असे म्हणू नये, सणावारा ला गोडाने सुरुवात करा, कॅलॅरीज मोजण्याने नव्हे ;) साहित्यः ३ कप चणाडाळ ३ कप चिरलेला गुळ २ टेस्पून साखर १/२ जायफळ पूड करून १ टीस्पून वेलचीपूड अडीच कप मैदा+१/२ कप गव्हाचे पीठ चिमूटभर मीठ ६ टेस्पून तेल तांदळाची पीठी पोळ्या लाटण्यासाठी पा़कृ: चणाडाळ स्वच्छ धुवून बोटाचेपे शिजवणे. शिजलेल्या डाळीतून पाणी गाळून घेणे. Image removed. ह्याला कट म्हण्तात. Image removed. एका पातेल्यात डाळ चांगली घोटून घेणे. Image removed. गुळ आणी साखर त्यात घालून एकत्र करणे . Image removed. पुरण आधी पातळ होईल सतत ढवळत राहीले के ते घट्ट होईल. Image removed. पुरण चांगले शिजले हे झारा/मोठा चमचा मधोमध उभा राहीला की समजते. Image removed. त्यात वेलची-जायफळपूड घालून नीट एकत्र करून पुरणयंत्रातुन वाटून घ्यावे. Image removed. हे झाले पुरण तयार. Image removed. मैदा+ गव्हाचे पीठ+मीठ+तेल घालून सैलसर भिजवावी. तेल-पाण्याने चांगले मळून घेणे. २ तास कणीक भिजवल्यावर चांगली बत्त्याने कुटून घ्यावी व परत मळून घ्यावी. Image removed. मैद्यची पारी करून त्यात पुरण भरून , पारीचे तोंड नीट बंद करुन घेणे. Image removed. तांदळाची पीठी लावूना हलक्या हाताने पोळी लाटणे. Image removed. तवा मंद गॅसवर ठेवून पोळी घालावी . Image removed. सारखे उलटू नये, एकीकडून नीट भाजली / शेकली की दुसरीकडून भाजावी/ शेकावी. गरमा-गरम साजुक तुपाबरोबर किंवा दूधाबरोबर खायला द्यावी. Image removed. कटाच्या आमटीबरोबर पण खाऊ शकता. Image removed.

वाचन 11813 प्रतिक्रिया 0