मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेळगावी मांडे

अजय जोशी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रथमच मी बेळगावात गेलो. एका खानावळीत (फारशी वळवळ नव्हती.तशी ती रिकामीच होती) गेलो. बाके नव्हती. कसाबसा खाली बसलो. ओथंबलेला (चारी बाजूने) आचारी एकदम म्हणाला, "मांडेऽऽ". मला कळेचना. नेमकी काय चूक झाली. पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ". "असं होय..", म्हणून मी मांडी घालून बसलो. तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ". मला वाटले बेळगावात सेल्फ सर्विस असावी. म्हणून मी स्वतःच उठून ताट-वाटी वगैरे घेतले. तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ". यावेळी इतक्या जोरात म्हणाला की, मी घाबरून काहीतरी अर्थ लावून ताट वगैरे सर्व मांडीवर ठेवले. (अर्थातच स्वतःच्या) त्याचे आपले चालूच होते. खूप वेळाने मला समजले की, 'मांडे' हा एक खाण्याचा पदार्थ आहे आणि ज्याला मी डोसा समजत होतो त्यालाच मांडे म्हणतात. मी स्वतःशीच हसलो आणि मनाशी म्हणालो 'सीमा प्रश्न का सुटत नसेल ते आत्ता कळाले.'

वाचन 4992 प्रतिक्रिया 0