मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

॥ स्फूर्ती देवीची आरती ॥

नरेंद्र गोळे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
॥ स्फूर्ती देवीची आरती ॥ स्फूर्ते अवघड भारी तुजविण संसारी । अज्ञानी वत्सांच्या ज्ञाना विस्तारी ॥ वारी वारी मजला अकर्मण्याद्वारी । कृतीच्या स्फूर्ती ने आम्हा निवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी, जय स्फूर्ती देवी । निष्चळ मन हो सत्वर, वर दे संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुलना तुज नाही । तव किमयेचे कौतुक कळते लवलाही ॥ अगणित मनुजा प्रेरक कमालीची ठरशी । ती शक्ती तू मज दे, गाईन तव कीर्ती ॥ २ ॥ उत्स्फूर्त वदने स्फूर्ती देशी निजदासा । आळसापासुनी सोडवी, वाढवी जीवनाशा ॥ स्फूर्ते तुज वाचून कोण वाढवी यशा । 'नरेंद्र' तल्लीन झाला, तव धरी जिज्ञासा ॥ ३ ॥ नरेंद्र गोळे २००४१०२० नवरात्रीला ह्या आरतीस आळवणार्‍याला स्फूर्ती प्राप्त व्हावी हीच प्रार्थना. ही आरती मायबोली व मनोगतावर ह्याआधीही प्रसिद्ध झालेली असली तरी इथल्या वाचकांस कदाचित नवीही वाटू शकेल.

वाचन 5010 प्रतिक्रिया 0