What is non-negotiable in your life?
सध्या "लीडरशिप" अर्थात नेतृत्व विषयक लेख वाचतेय. माझा अतोनात आवडीचा विषय. म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठी नाही तर नुसता वाचनमात्र म्हणून.
एक खूप सुंदर लेख *१ वाचनात आला काल परवा. विषय होता - What is non-negotiable in your life?
अर्थात तुमच्या जीवनात तुम्ही काही मूल्य अतीव प्रेमादरानी म्हणा, अतिशय ध्यासाने म्हणा अशी ऊराशी धरली आहेत का ज्यांच्याशी तुमच्या जीवनात तडजोडीला स्थान नाही?
मग लेखकाने पुढे दिले आहे जर तशी मूल्य नसतील आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचं आयुष्य हे वादळात हेलकावे खाणार्या नौकेसारखं का भरकटत आहे किंवा तुम्ही समाधानी का नाही आहात तर ते रास्तच आहे ई. ई.
लेख खूप विचार करायला लावणारा होता.
मला लेखानी ढवळून काढलं.
प्रत्येकाच्या मनाच्या खोल कुपीत एक स्वप्न असतं. ते साकार होतच असं नाही. मग सगळे कसे शहाण्यासारखे सामोरे जातात? मला वाटतं कोणी मित्रांचा आसरा घेतं, कोणाला मानसोपचारतज्ञाची गरज पडते , कोणाला अध्यात्माची तर कोणाला दारूची . पण हा हळवा कोपरा असतो जरूर.
यासंदर्भात खूप समृद्ध करणारं कुणाच्यातरी*२ खवमधे कुणीतरी*२ लिहीलेलं हे वाक्य मी वाचून टिपून ठेवलं होतं.- अवचटांना लिहिलेल्या पत्रातले 'प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा कोपरा असतो की जेथे तो तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ शकत नाही. कारण तसे करावे लागले की मग सगळे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते'
*१ http://www.leadershiparticles.net/Article/Leadership---What-kind-of-Legacy-will-you-Leave-/1607
*२(हे दोघं मान्यवर लेखक आहेत मिपावरचे. त्यांनी मला माफ करावं त्यांची खव इथे उध्रुत केल्याबद्दल. पण वाक्यच तसं सुंदर, समृद्ध करणारं आहे.)
वाचन
3763
प्रतिक्रिया
0