मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही खावेसे वाटते पण खाणार नाही

अरुण मनोहर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही पण खाणार नाही गरगरीत पोटाचा ढेर वाढू देणार नाही काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही पण खाणार नाही |धृ| बासुंदी श्रीखंडपुरी आमरस रत्नांगीरी पुरणपोळी तुपे माखली चाखती घरोघरी चिकनकरी मटनमच्छी चोपती काहीबाही शेवटी आइसक्रीमात रसगुल्ले घालुन खाई सारे खा|वेसे वाटते पण खाणार नाही पण खाणार नाही |१| केक थोरला गोडसा आहे समोर ठेवला चॉकलेट लोण्याची छान नक्शी काढला आत भरले असती अक्रोडाचे तुकडे काही त्याकडे मी आससुनी पुन्हा एकदा हो पाही सारे खा|वेसे वाटते पण खाणार नाही पण खाणार नाही |२| माझ्या ताटात वाढला बेचव भाजीपाला हातसडीचा तांदूळ डाळीच्या जळी भिजला खिरीत साखर नाही पोळी एकलीच राही कारल्याच्या भाजीने हो अंगाची कडू लाही काही खा|वेसे वाटेना मुळी खाणार नाही मुळी खाणार नाही |३|

वाचन 9385 प्रतिक्रिया 0