प्रतिमा सृष्टी
काल घरी गेलो.
दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही.
काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय?
तर तीही जागची गायब.
काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना.
जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:-
"अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी
जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला)
काय,चाललयं तरी काय ईथे?"
खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.)
मला आठवलं मी ईथे नवीन रहायला आलो होतो. घराला नुसतं एक दार होतं.आत रिकामी जागा होती.त्यालाच घर म्हणायचं.
म्ह्मटलं ठीक आहे.दुसर्या दिवशी जाउन घर लावायला घेतले.जाउन नवीन मोठ्ठा आरसा आणला.
दारातुन नेताना,दाराने जरा आवाज् काढला.म्हणलं वा! दाराला हि काच पसंत आहे म्हणायची.
आणि असणारच.किंचित सावळी,पण फ्रेश दिस्णारी,सदा तजेल्दार अस्णारी अशी ती होती.
तिच्यात स्वतःला पाहुन् ते दार चकितच झाले!
आपल्या रुबाबाची,मज्बूतिचि आणि वेगळेपणाची हे सगळे अशि तारीफ का करतात हे त्याला समजले!
दार खुश झाले!आपल्या अस्तित्वाची जाणीव त्याला तिच्यामुळे झाली.
"एरवी इतरांनी आत बाहेर करण्यापुरता आपला काय् तो वापर" असे समजणार्या दाराला तिच्यामुळे कळलं
"अरेच्चा! आपण नुसते ह्यांनी हलवल्यावर हलण्यापुरते नाही आहोत!आपणही हलु शकतो,बाहेरुन
धुळ येत असेल तर अडवु शकतो.बाहेरच्या वाइट नजरा रोखुन धरायचे सामर्थ्य ह्या घराचे स्वामि म्हणवितात
त्यांच्यातही नाही,पण आपल्यात आहे!"
दार रोज त्या आरशातील काचेत स्वतःचे रुपडे न्याहळत असे,आपली,आयडेंटिटी पाहुन त्याची छाती गर्वाने तट्ट् फुगुन येइ.
दाराने मग दिन रात वाइट नजरा येताच त्यांना अडवायला सुरुवात केली.
येणारी "सर्व प्रकारची धूळ्" ते दार अडवु लागले.
दाराला स्वतःची जाणीव आणखी द्रुढ् होउ लागली.
दाराचे सगळीकडे नाव झाले.कौतुक झाले.
दाराने तसुभरही त्या काचेला धन्यवाद दिले नाहीत.
आणी वेड्या काचेनेही ते अपेक्षिले नाहीत! ती रोज त्याला त्याच्या रुपाची,अस्तित्वाची जाणीव करुन देउन तृप्त होइ.
वेडी कुठली,तिच्यामुळे त्याला आपले रुप कळाले यात ती खुश होती,तिला तिचे रुप धड कळले नाही तरी!
बस झालं मग,दोघांची एकमेकांवर प्रीत जडली.
आणाभाका झाल्या. जीवाशी जीव जडले.
पण काही दिवसांनी काय झालं,
काच म्हणाली जरा बाजुच्या खोलीत जाउन येते.
चार दिस् र्हाउन येते.तेवढे दिवस तु आपला सांभाळ हां राज्जा.
पण दाराच्या कपाळावर पसरल्या आठ्या.डोळे झाले लाल.
"तु जाशील?अन् मग मी काय करु ईथे?कुणाला दाखवु माझा रुबाब?माझा थाट?
ते काही नाही.तु आजन्म माझी आहेस.हितुन तु जाणे मला मंजुर नाही."
"तुझी मंजुरी हवी कशाला?इथे आले ते तुझ्या मंजुरिने नाही. जाइन तीही माझ्या इच्छेने.
मी येताना तुझ्यामाझ्यासाठी एक् मूठ घेउन येइन.ती तुला बसवली ना,म्हणजे तु अजुन देखणा होशील."
"काय,?!मला, ह्या दाराला मूठ लावणार तु? बन्धनात अडकवणार?फारच चेकाळली आहेस्.
लक्शात ठेव, तु असशील काच ,मी पण आहे बलदंड दार."
काच झाली अधीर,बाहेर च्या जगाच्या उत्सुकतेने ती झाली अनावर.
"मी निघतेयं.." येवढच म्हणली आणि ताठ मानेने दाराबाहेर चालु लागली.
दार ही चिडलं,आपला "अधिकार" संपतो आहे दिसताच त्यानं अडवण्याचा प्रयत्न केला.
पण काच तरीही पुढच जाउ लागली.
"ही असली ठिसुळ,माझ्या पुढे जाते काय?" त्याचा पारा आणखीनच चढला.
त्याने जोरदार धडक दिली तिला. खाळ्कन् आवाज झाला.काच तुटली,फुटली,शत् शत् तुकडे होउन पडली.
जखमी स्थितीतही चेहर्यावर तिच्या होतं हसु:- "मोड्ले मी,पण वाकले नाही!"
दार आपल्याचं आनंदात मश्गुल होते."कसा शिकवला धडा! अधिकार खतम् तर् वस्तु खतम्.."
पण थोड्या वेळाने राग किंचित् कमी झाला(संपला नाही.)
आणि ह्या विजयी अवस्थेत आपण दिसतो कशे हे पाहण्यासाठी त्याने पाहिले भिंतीवर्.
काच असायची तिथे.
"अरेच्चा! पण ..पण..मी दिसत का नाहिये? हे काय झालयं?"
दाराला प्रश्न पडला आणी फक्त क्षण भरापुर्वि काय अघटीत घडलयं हे त्याला उमगलं.
पण आता त्याला स्वतःला "तो स्वतःच"सापडेना!
त्याची आयडेंटिटीच हरवली.
आयडेंटिटी नाही ,तर सामर्थ्य ही गेले.
त्याला काहीच कळेना. तो ओक्साबोक्षी रडु लागला.फुट्ली काच जोडु लागला.
पण काच आता थोडिच रिकव्हर होणार होती?ती तर गेली निघुन पार...पलीकडे...
त्या तिथल्या उंचावर्च्या हसर्या सरोवराच्या नितळ स्वछ पाण्यात हंसाना त्यांचे रुप् दाखवणारी
पाण्याची सप्तरंगी किनार ती बनुन गेली होती.
रडणे थांबले.पण आक्रोश नाही. तो दिङ मूढ होउन बसला. तो कायमचाच!
वाचन
10148
प्रतिक्रिया
0