फिल्मी लफडी, कुलंगडी - अघळपघळ गप्पा!
लेखनप्रकार
राम राम मंडळी,
मनुष्य म्हटला की त्यासोबत त्याचे गुणदोष हे आलेच. सर्वगुणसंपन्न कुणीच नसतो, तसेच सर्वस्वी दोषी, पापी, दुरचारीही कुणीच नसतो. स्त्रीपुरुष म्हटलं की त्यासोबत एकमेकांबद्दल प्रेमप्रकरणं, कुजबूज, कानगोष्टी, लफडी-कुलंगडी, या गोष्टीही येणं काही अस्वाभाविक म्हणता येणार नाही!
तुम्हाआम्हाला (म्हणजे निदान मला तरी!), प्रथमपासूनच कुणाचं सूत कुणासोबत जमतंय, कुणाचं लफडं भलतंच रंगात आलं आहे, कुणाचं मेतकूट आहे, कुणाचं सध्या फाटलं आहे यासारख्या भानगडीत इंटरेस्ट अगदी चिक्कार! त्यातून आम्हा कोकणातल्या लोकांना तर यासारख्या गॉसिपिंगमध्ये भारीच रस!
तर ते असो! सांगायचा मुद्दा असा की आपली हिंदी फिल्म इंडष्ट्री म्हणजे तर यासारख्या गॉसिपिंगचा खजिनाच! तेच गॉसिपिंग इथे करण्याकरता, जरा विरंगुळा म्हणून आम्ही हे सदर इथे सुरू करत आहोत. हिंदी फिल्म इंडष्ट्री मधल्या तुम्हाला माहीत असलेल्या, तुमच्या कानावर आलेल्या प्रेमप्रकरणांबद्दल, लफड्याकुलंगड्याबद्दल इथे मुक्त चर्चा करा आणि दोन घटका जरा गंमत करा!
मात्र एक लहानशी अट - स्वत:च्या मनाने बातम्या बनवू नका! :) तुम्ही लिहीत असलेल्या भानगडींचा कुठल्यातरी वर्तमानपत्रात किंवा फिल्मी मासिकात उलेख हवा. (दुवा द्यायची गरज नाही!)
चला तर मंडळी, मीच सुरवात करतो -
अलिकडे दिपिका पडूकोन हे नांव मी फार ऐकतोय. ही म्हणे कुणा क्रिकेटियर सोबत ऑस्ट्रेलियाला फिरायला गेली होती! असो.. (मेलीला ऑस्ट्रेलिया फिरायला तात्या मोकळाच होता तो दिसला नाही!) असो, तशीही दिपिका मला फारशी आवडत नाही!
करिना कपूरने अलिकडे शाहिद कपूरला टाकला म्हणतात. तिची आवशी बबिता, तिला म्हणे ते पसंद नाही. नाहीतरी करिना अगदी सगळ्या गोष्टी आईला विचारूनच करते म्हणा! :)
हल्ली करिना आणि आमच्या शर्मिलाचा मुलगा सैफ यांचं बरंच सूत जुळलं आहे असं मी ऐकून आहे. सैफने त्याची बायडी अमृता सिंगला हल्ली टाकली म्हणे! :)
प्रियांका चोप्रा आणि महेन्द्रसिंग धोणी यांनी एकत्र जमून गेल्या वर्षीचा ३१ डिसेंबर परदेशात साजरा केला म्हणतात! असो.. खरंखोटं देव जाणे! :)
चला! पुरे झाल्या देवगडी पारावरील गप्पा! घरी जाऊन आन्हिकं आवरली पाहिजेत. आज त्या हलकट आप्पा पेंडश्याकडे सत्यनारायण सांगायला जायचंय! फोकलिच्याच्या चेहेर्यावर एकवीस रुपये दक्षिणा देतांना एकवीस लाख रुपये दिल्याचा आविर्भाव असतो! :)
आपला,
(देवगडी गजालीकार!) तात्या.
वाचन
12778
प्रतिक्रिया
0