महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती! ;)
मनसे आमदारांनी घातलेल्या "विधानसभेतील" गोंधळामुळे मला जितके वाईट वाटले त्याहूनही अधिक वाईट आपण किती मागासलेले आहोत हे खालील चित्रफिती पाहाताना जाणवून शरमेने मान खाली गेली :)
तैवानमधे एक स्त्री खासदार सभागृहात सभापती स्त्रीच्या कानाखाली वाजवू शकते (हा व्हिडीओ दुव्यावर टिचकी मारूनच बघता येईल!)
--------------
फक्त अठ्ठावन्न सेकंदात लोकशाही कशी वागू शकते ते कोरीयातील सभागृहातील दृश्यात खाली पहा. जर तूनळी मुळे काही प्रश्न येत असेल तर हा दुवा पहा.
-----------------------------
अबू आझमी नशिबाने महाराष्ट्रातच होता, युक्रेनमधे कानाखाली कशी वाजवली असती ते पहा येथे!
-------------------------------
हा पंजाब!
------------------------------
आणि भारतभाग्य विधात्याचे हे मूळ केंद्र!
मला सांगा या सर्वांपुढे जे काही महाराष्ट्रात झाले ते किती पुचाट वाटते? राज्यस्थापनेस साठ वर्षे होणार, तरी आपण पुढारलेले आहोत असे वाटते का? दिल्ली बहौत दूर है! (हिंदीत का लिहीले म्हणून विचारू नका कारण विधानसभेतपण त्यावेळेस "अबू आझमी चोर है!" अशाच घोषणा दिल्या जात होत्या!) :-)
असो. या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर!
वाचन
6278
प्रतिक्रिया
0