मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चखना पेश्शल.

गणपा · · पाककृती
मंडळी विकांत जवळ आला, आठवडाभर कष्ट उपसुन उपसुन थकला आसाल नै. तेव्हा श्रमपरीहारार्थ तिर्थपान ;) होणारच असेलच. (ड्रायडेपण आज संपेल. आगीत तेल टाकातोय कारे भाऊ. ;) ) तर तुमच्या उद्याच्या तिर्थपानाच्या जोडीला ही सोबत. (काल सुट्टी मुळे आम्ही कालच विकांत साजरा केला.) १) पायनॅपल चीज चेरी : पाकृ. एकदम सोप्पी. अननसाचे आणि चीज लहान चौकोनी तुकडे करुन घ्या, पाकात मुरवलेल्या चेरीचे १/२ तुकडे करुन घ्या. खालील प्रमाणे एकावर एक रचा मध्ये एक टुथपीक लावा. थोडा वेळ फ्रिज मध्ये गार करा. आणि सर्व्ह करताना बर्फाच्या तुकड्यांसोबतच द्या. २) कोलंबी फ्राय + उकडलेली अंडी : ३) ऑलटाइम फेमस मसाला पापड : ४) मटण चॉप्स फ्राय :जुन्याघरी रहातानाची ही पाककृती ५) पोर्कचीली : ६) पोर्क फ्राय : पाकृ. पोर्कचीली सारखीच फक्त कांदा आणि मिरची वगळा. ७) सॉसेजेस फ्राय :> कृती: सॉसेज चे लाहान तुकडे करुन, थोड्या तेलावर आल-लसणाच्या पेस्ट वर शॅलोफ्राय करुन घ्या. वरुन भरड काळीमीरी पुड टाका. तव्यावर असतानाच चीझ स्लाईसचे लाहान तुकडे करुन प्रत्येक सॉसेज च्या वर ठेवा. (जर मायक्रोवेव्ह असेल तर चीझ वर लावल्यावर २०-३० सेकंद ठेवा.) जरास चीझ वितळुन पसरेल असपहा. ८) मटण सुक्का : ९) फिश फ्राय : १०) रेशमी कबाब : पाकृ क्रमशः : जर मायबाप वाचकांची परवानगी असेल तरच ;) सध्या निस्ता फटु. अस्मादिक तर काय मंडळी होउन जाउदे..

वाचन 22728 प्रतिक्रिया 0