मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद ...

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ह्या धाग्याचा उद्देश, फक्त हसणे आणि हसवणे, इतपतच आहे. मी वाचलेले काही विनोद देतो... -------------- "येथे हवा भरून मिळेल...!!" लेखक - डॉ. आर. डी. कुलकर्णी. काही वर्षापूर्वी माझ्या दवाखान्यात घडलेला मजेदार किस्सा. एक दिवस दुपारी दवाखाना बंद करण्याच्या वेळेला, साधारण मध्यमवयीन दिसणारा रुग्ण माझ्याकडे आला. त्याला अधून मधून चक्कर यायची असं त्यानं सांगितलं. तपासणी करत असताना त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारून मी त्याचा रक्तदाब पाहायला लागलो. तो जरा गोंधळल्यासारखा झाला आणि म्हणू लागला की “डाक्टर साहेब, मी लई गरीब माणूस हाये. मला आसलं काय बी बांधू नगा." अर्थात ग्रामीण भागामध्ये काम करत असताना अशा गमतीशीर गोष्टींची मला सवय होतीच. त्या मुळे मला याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. मी त्याला थोडं समजावून सांगितलं आणि तपासणी नंतर काही औषधं लिहून दिली. दोन आठवड्यानंतर परत यायला सांगितले. साधारण पंधरा दिवसानंतर ते महाशय माझ्याकडे परत आले. सोबत अजून एक जण होता. त्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे ते माझ्या पक्के लक्षात राहिले होते. मी त्यांना कसं आहे असं विचारलं असतां, अगदी हसत हसत “समदं बैजवार हाये, आता काय बी तरास न्हाय, चक्कर बी नाय आली पुन्यांदा." असे उत्तर आले. फेरतपासणीसाठी आले असे समजून मी त्यांना औषध लिहून दिलेला कागद मागितला आणि लिहून दिलेली सगळी औषधे नीट घेतली नां हे ही विचारले. त्यावर ते म्हणाले, "कसला कागुद? कसली औषदं? म्या काय नाय घेतलं." मला काही समजेना आणि मी परत विचारले की, अहो तुम्हीच म्हणालात ना आता मला काही त्रास नाही ते कसं?. त्यावरचं त्यांचं उत्तर ऐकून मलाच चक्कर यायची बाकी होती. ते गृहस्थ म्हणाले, "डाक्टर, असं काय करतायसा. त्या टायमाला तुमी पट्टा बांधून हावा नाय कां भरली माझ्या हातात, घरी जाईस्तोवर माझी चक्कर थांबली की. बिगर औषध पाण्याचं काम झालं बगा माझं. लई भारी हाये तुमी. म्हणून आज माझ्या पावण्याला घिवून आलोय हावा भरायला. त्यास्नी बी चक्कर येतीया. तेवढी हावा भरा लवकर." हे ऐकून आता मलाच चक्कर येवून दातखीळ बसायची मात्र बाकी होती. --------- बायको :-- अहो, उन्हाने माझी स्किन खूप ऑयली ऑयली झालीय, सांगा मी काय करू??? नवरा :-- विमबार लाव... सगळा चिकटपणा घालवतो...!!! -----------

वाचन 5927 प्रतिक्रिया 0