रॉ मँगो राईस (कैरी-भात)

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
6 May 2015 - 1:35 pm

.

साहित्यः

२ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात असेल तरी चालेल)
१ वाटी कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी-जास्तं घ्यावे)
२ हिरव्या मिरच्या चिरून
कढीपत्ता
२-३ लाल सुक्या मिरच्या
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून चणाडाळ
१ टीस्पून उडदाची डाळ
१/४ टीस्पून मेथीदाणे
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
१ टेस्पून काजू (तुम्ही शेंगदाणे ही वापरु शकता)
मीठ चवीनुसार
खोबरेल तेल (रोजचे वापरातले तेल घेतले तरी चालेल)

.

पाकृ:

भांड्यात खोबरेल तेल गरम करून मोहरी. मेथ्या, डाळी व हिंगाची फोडणी करावी.
डाळी लालसर परतल्या गेल्या की त्यात हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता व काजू घालून परतून घ्यावे.
आता त्यात हळद घालून वरून शिजवलेला भात घालावा व मिक्स करावे.
आता त्यात कैरीचा कीस, मीठ घालून हलके मिक्स करुन घ्यावे.
झाकण ठेवून एक वाफ काढावी.

.

हा भात तुम्ही लोणचं, पापड किंवा रस्समसोबत सर्व्ह करु शकता.
आधी करुन ठेवला तर कैरीचा स्वाद छान मुरेल.

.

प्रतिक्रिया

मस्त..
करुन पाहिला जाईल.

मधुरा देशपांडे's picture

6 May 2015 - 1:57 pm | मधुरा देशपांडे

तोंपासु. सादरीकरण, फोटो बद्दल नेहमीचेच. लवकरच करण्यात येईल.

वा वा वा... मस्त एकदम... इथे कैरीपण मिळत नाही. :P
मी कसा करणार?

स्मिता श्रीपाद's picture

6 May 2015 - 2:15 pm | स्मिता श्रीपाद

मस्त दिसतोय
यात थोडा ओला नारळ पण घालायचा....मस्त सट्ल ( मराठी प्रतिशब्द ?) टेस्ट येते त्याने.

सानिकास्वप्निल's picture

6 May 2015 - 2:24 pm | सानिकास्वप्निल

टीप आवडली पुढल्या वेळेस तसे करेन :)
पण मी जनरली फोडणी खोबरेल तेलाची करते त्यामुळे त्याचा स्वाद ही छान येतो.
धन्यवाद.

त्रिवेणी's picture

6 May 2015 - 2:32 pm | त्रिवेणी

ने ह मी प्र मा णे सुं द र.

विशाखा पाटील's picture

6 May 2015 - 4:48 pm | विशाखा पाटील

अ सं च म्ह ण ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2015 - 6:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो. छान.....!

-दिलीप बिरुटे

अप्रतिम ग....छान होतो हा भात.

नूतन सावंत's picture

6 May 2015 - 3:22 pm | नूतन सावंत

चित्रान्न.अगदी मस्त सानिका .आवडता पदार्थ.सादरीकरण नेहमीप्रमाणेच उत्तम.

माहितगार's picture

6 May 2015 - 3:46 pm | माहितगार

छायाचित्रांनी भूक छान चाळवली, जरासे मेतकुट अ‍ॅडवण्याचा ऑप्शन वापरल्यास तेलकटपणा शोषला जातो आणि मेतकुटाचा खमंगपणाही येतो. आम्हीही या कैरीखीस भातास चित्रान्नच म्हणतो, चित्रान्न हा शब्द कोण कोणत्या भागात वापरतात ?

पैसा's picture

6 May 2015 - 4:26 pm | पैसा

मला वाटते चित्रान्ना हा कानडी शब्द आहे.

स्नेहल महेश's picture

6 May 2015 - 3:26 pm | स्नेहल महेश

अप्रतिम......................

नितिन५८८'s picture

6 May 2015 - 3:42 pm | नितिन५८८

मस्तच... कर्नाटक मध्ये असाच चित्राअन्ना करतात

पैसा's picture

6 May 2015 - 3:45 pm | पैसा

मस्तय! मला खूप आवडतो! फोटो आणि डिटेल पाकृ एकदम झक्कास!

सस्नेह's picture

6 May 2015 - 3:53 pm | सस्नेह

चित्रान्न म्हणतात ना याला ?
फोटो नेहमीप्रमाणे नयनरम्य !

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा

दुत्त दुत्त दुत्त!!! :-\

रायनची आई's picture

6 May 2015 - 4:33 pm | रायनची आई

पण कच्ची कैरी डायरेक्ट किसून घातल्याने अति आंबट होत नाही? कि थोडा गूळ घालायचा?

माहितगार's picture

6 May 2015 - 4:54 pm | माहितगार

गूळ कसा घालता येईल कल्पना नाही (गूळ वा साखर अ‍ॅडवल्याने साखरभाताचा टच येईल ?). मुख्य मुद्दा, हा पदार्थ जरासा तरी आंबटपणा आवडून जाणार्‍यांसाठी अहाहा असा सुखकर आहे, आंबट कमी आवडत असल्यास कैरीचा खीस कमी घालणे हाच पर्याय. त्यातली कैरी वजा केली की फोडणीचा भात होईल हे वेगळे सांगणे न लगे :)

सानिकास्वप्निल's picture

6 May 2015 - 5:02 pm | सानिकास्वप्निल

अगदी बरोबर माहितगार :)
धन्यवाद

बाकी रायनची आई तुम्ही लेमन राईस कधी खाल्ला आहे का? त्याप्रमाणेच लागतो हा ही आणि कैरीचे प्रमाण आपल्या चवाप्रमाणे बसवू शकता :)

मोहनराव's picture

6 May 2015 - 4:44 pm | मोहनराव

छान!

मस्त ब्राईट दिसतोय. आता कैर्‍या हळूहळू बाजारात यायला लागल्या आहेत. करून पाहीन हा भाताचा प्रकार.

अजया's picture

6 May 2015 - 6:39 pm | अजया

आज आत्ता ताबडतोब करण्यात येत आहे.सकाळचा भात आणि शेजार्यांच्या झाडाची कैरी असा कच्चा माल तयार आहे!!

स्वाती दिनेश's picture

6 May 2015 - 8:04 pm | स्वाती दिनेश

मस्त!
कैरीभात आवडता आहेच.. आता मैत्रिण येणार आहे तेव्हा कैरीभात करेन.
स्वाती

स्रुजा's picture

6 May 2015 - 10:16 pm | स्रुजा

वा वा .. किती छान दिसतोय. मी फोडणीच्याच प्रेमात पडले आहे जास्त. फोडणीसाठी भात करणार.

दिपक.कुवेत's picture

6 May 2015 - 11:10 pm | दिपक.कुवेत

फोटो नेहमीप्रमाणेच कातील....

सुहास झेले's picture

6 May 2015 - 11:13 pm | सुहास झेले

नेहमीप्रमाणे अफाट... ह्या विकांताला नक्की करून बघणार :) :)

hitesh's picture

7 May 2015 - 10:37 am | hitesh

पण ते तेलाचं सरोवर बघुन जीव खालीवर होतोय.

इतकं तेल !

माहितगार's picture

7 May 2015 - 11:08 am | माहितगार

त्यांनी फोडणीत दाणे, दाळी, आणि काजू वापरले आहेत ते तळल्या जाण्यासाठी सहाजिक तेल अधिक वापरले जाणार, दाळींएवजी भट्टीतल दाळं (दाळव) , दाणे काजू नुसते अ‍ॅडवले + भात जरासा ओलसर असेल तर अगदी कमी तेलाच्या फोडणी वर चालवता येते. आणि उरलेला तेलकटपणाचा फिलही घालवण्यासाठी मेतकुट अ‍ॅडवणे हा उत्तम पर्याय असू शकेल.

सानिकास्वप्निल's picture

7 May 2015 - 11:23 am | सानिकास्वप्निल

दोन वाट्यांचा भात असल्यामुळे व फोडणीत इतर जिन्न्स असल्यामुळे तेल त्याप्रमाणे घेतले आहे. तुम्ही सगळं प्रमाण स्वत:च्या आवडीनुसार घेऊ शकता :)

तुषार काळभोर's picture

7 May 2015 - 11:32 am | तुषार काळभोर

पुन्याला?

प्रणित's picture

7 May 2015 - 12:41 pm | प्रणित

या विकान्तला बनवण्यात येइल

कविता१९७८'s picture

7 May 2015 - 12:46 pm | कविता१९७८

अतिशय तों.पा.सु. पाकक्रुती

स्वाती२'s picture

8 May 2015 - 2:10 am | स्वाती२

फोटो पाहूनच भूक लागली. छान पाकृ!

सुघोषा's picture

8 May 2015 - 7:34 am | सुघोषा

अप्रतिम !!!!

स्नेहानिकेत's picture

10 May 2015 - 8:30 pm | स्नेहानिकेत

मला फोटोच दिसत नाही. पण छान पाकृ....तोंडाला पाणी सुटले. उद्याच करून बघते..

स्नेहानिकेत's picture

10 May 2015 - 8:32 pm | स्नेहानिकेत

दिसले दिसले फोटो..... अप्रतिम!!!!!!!

अरेवा !!चला डब्यात न्यायला एक मस्त जातपात पदार्थ भेटला ...