मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कवितेचा अर्थ हवा आहे..

सांजसंध्या · · काथ्याकूट
पिपात मेल्या ओले उंदीर असे आणलेसंच कसे, बघितल्याविण फुकट मिळाले म्हणुनी आणशी न बघता तू, बुद्धिहीन बीळ सोडुनी सांग कसे ते पिपात (या) आले ओले होऊन? दिवस सांडला बोंबलत फिरण्यात या गिळायला, आता हातपाय धूऊन अंगात ना काही शक्ती आहे, डोक्यात ना कुणी युक्ती आहे. पोरींवरती लहरी डोळे फेकशी पण मधाळ स्मित; त्या ओठांवरचे, ते ही बेकलाइटी, बेकलाइटी! रागाने करीसी पिंप आडवे, पिपात(ले) उंदीर पळाले! पळाले! बा. सी. मर्ढेकर ------------------------------------------------------------ उंट - विंदा करंदीकर क्षितिज नाचले वाळूभवती वाळु बरळली, ’नाही, नाही.’ अशाच वेळी उंट उगवला; आणि म्हणाला, ’करीन काही.’ अन मानेच्या बुरुजावरती चढले डोळे अवघड जागी; क्षितिज पळाले दूर दूर अन वाळु जाहली हळूच ’जागी’. रूप असे पाहुनी अजागळ भुलले वाळूचे भोळेपण; आणि तिच्या त्या वांझपणावर गळला पहिला सृजनाचा क्षण. उंट चालला वाळूवरुनी वाळु म्हणाली, ’आहे, आहे.’ ...खय्यामाने भरले पेले; महंमदाने रचले दोहे. हा यात्रेकरु तिथे न खळला. निळा पिरॅमिड शोधित जाई! तहानेसाठी प्याला मृगजळ; भूक लागता तहान खाई. निळा पिरॅमिड दिसला का पण? ...खूण तयाची एकच साधी... निळा पिरॅमिड दिसतो ज्याला तोच पिरॅमिड बनतो आधी. --------------------------------------------------------------------------- वेडी....... विंदांची कविता...... एका ढगाला कुशीत घेऊन झोपली,तेव्हा तिला गर्भ राहिला. पुढे सर्व सुरळीत झाले.आपल्या घरातील मातीचे मडके मनमुराद फोडून ती देहान्ताच्या यात्रेला निघाली. वाटेत तिला गाढव भेटले,तिने त्याची समार्म्भपूर्वक पूजा केली. धुपाटण्यांतला उरलासुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली, "ह्याचीसुद्धा राख होती तर कोणाला काय सांगणार होत्यें? पण दैव शिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढें जाते." नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली;आणि म्हणाली, "आता मी कूणाचे काही लागत नाही,पौर्णिमीवढेहि". पुढे सर्व सुरळीत झाले(हे मागे सांगितलेच आह.े) वेडीला वीज झाली;आपले स्तन विजेला देऊन वेडी आपली पुढे गेली;वाटेमध्ये विदूषक भेटला; राजा भेटला,राणी भेटली;’अ’ भेटला,’ब’ भेटला; पण वेडी शहाणी होती;तिने कोणालाच ओळखले नाहीं. ------विं. दा. करंदीकर.

वाचन 11193 प्रतिक्रिया 0