मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

खिलजि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कशी वाटली आमची दहा बाय दहा आनंद ओसंडून चाललाय पहा शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी सासू लाटतेय चपाती भाजतेय सून मोठी धाकटीने घातलाय कपड्याना पीळ मधली करतेय पोरांचा सांभाळ छोटंसं घर त्याचं इनमीन चार वासं इवल्याश्या घरात राहतात बाराजण कसं ? महालाला लाजवेल अशी घराची शोभा महादेव प्रसन्न हस्ते जागोजागी उभा घराला घरपण माणसांनीच येते भुई चालेल कमी पण लागते घट्ट नाते सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचन 2556 प्रतिक्रिया 0