मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यथा

वैभवदातार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे खूप पाऊस पडतो आहे. अवकाळी पावसाचा पिकांवर वाईट परिणाम होईन खूप नुकसान होते आहे. बळीराजाच्या मनातील व्यथा मी शब्दबद्ध केली आहे... नको नको रे पावसा घालू अवेळी धिंगाणा नको हिरावून नेऊ माझा मोतियाचा दाणा कष्ट करुनि शनिवारी येते मातीतून पीक थांब थांब रे पावसा माझी हाक तू ऐक छोटी छोटी माझी पिल्ले उभी भुकेली माझ्या दारी पोट भरीन मी त्यांचे दाणे विकून बाजारी वर्ष भर मी राबून सोने शेतात उगले तुझ्या अवेळी येण्याने कोळसे त्याचे झाले तुझ्या अवेळी येण्याला माणूस कारण आहे निसर्ग संपत्तीचा ऱ्हास त्याने केला आहे आता येतील शेतात समाजावण्या मंत्रीगण दाखविती जागा सारे कसा नाही शिल्लक कण कोटी कोटी उड्डाणे होती आता पैशाची दाखविती मंत्री सारे किती काळजी शेताची त्यांचे पैसे आश्वासने हवेत विरून जाती रिकामी माझी झोळी नाही दमडी माझ्या हाती विनवितो मी बळीराजा थांबव वर्षांबाण पुन्हा उठून उभा राही भरून काढण्या नुकसान --शब्दांकित (वैभव दातार ) ५ डिसेंबर २०१७

वाचन 2080 प्रतिक्रिया 0