मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नास्तिकांचे "पसायदान'' कसे लिहाल ?

माहितगार · · काथ्याकूट
ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे पसायदान अस्तिकांच्या सर्वोत्तम प्रार्थनांपैकी एक समजले जाते. (मी अज्ञेय असल्यामुळे ते समजून घेऊ शकतो.) अशा उदात्त ईश्वरनिष्ठेचा स्वतःतील खलत्वापासून दूर ठेऊन घेण्यासाठी अनेकांना फायदा होतो, (ईश्वरनिष्ठांचे मांगल्य, मन शांती ईत्यादी फायदे आहेतच) पण सामाजिक वास्तव तर्कशास्त्राच्या चिमुटभर मिठासोबत स्विकारावे लागते . सर्वच आस्तीक खल प्रवृत्ती विहीन असतील असे प्रमाणपत्र देता येत नाही तसे सर्व नास्तिक खल प्रवृत्तीचे असतात असा शिक्काही मारता येत नाही (ज्यांचे या बाबत दुमत आहे त्यांनी माझ्या मिपावरील स्वामी विवेकानंदांचे संदर्भ देणारे दुवे आणि प्रतिसाद वाचावेत) . पसायदानातील काही ओळींचा संदर्भ घेऊन वेगळ्या विषयावर एक लेख लिहावयाचा आहे. पण त्याच वेळी हा ही विषय सूचला की नास्तिकातही सत-प्रवृत्त लोक असू शकतात त्यांची ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे पसायदानाची आळवणी करताना देव आणि ईश्वरनिष्ठा या संकल्पनांनी जरशी पंचाईत होते, पण "खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥" या बद्दल त्यांचा वाद नसतो. दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥ यातील स्वधर्म शब्दाची व्याख्या धार्मिक न राहता स्वभाव विशेष + कर्तव्य अशी रहाणार असेल तर याही ओळीत त्यांना फारसे काही वावगे दिसू नये असे वाटते. वर्षत सकळमंगळी । 'सकळांचे मगंल होवो' या प्रार्थनेतही त्यांना काही चुकीचे वाटणार नाही. "ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥" या ओळींच्या पुढे नास्तिकांना कदाचित पुर्नलेखन करावे लागेल. नास्तिकांच्या प्रार्थनेत पसायदान शब्द असावा का या बद्दल काही नास्तीक आणि काही आस्तीक साशंक असल्यास पर्यायी चपखल शब्दाचाही विचार करण्यास हरकत नसावी. धागा लेखाचा उद्देश नास्तीकांना चालेल्शी उदात्त प्रार्थना लेखनास प्रोत्साहन आहे. उद्देश्य ज्ञानेश्वर माऊली लिखीत पसायदानाचे विडंबन अथवा आस्तीकांच्या भावना दुखावण्याचा ठेऊ नये -कारण उद्दीष्टाच्या उदात्ततेला बाधा येईल हे लक्षात घ्यावे. पद्यच पाहीजे असे नाही गद्य स्वरुपात लिहिले तरीही चालेल. आस्तीकांनी नास्तिकांचे पसायदान लिहू नये अथवा नास्तिकांची प्रार्थना कल्पून दुराग्ररहीत थट्टा काव्य लिहिण्यासही माझी ना नाही पण उद्दीष्ट सकारात्मक ठेवावे. सुचले तर लिहा नही तर चर्चा करावी पण अनुषंगिकापलिकडे अवांतर टाळण्यास आणि धागा चर्चेत सकारात्मक सहभागासाठी आभार.

वाचन 17029 प्रतिक्रिया 0