मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चना चिली

केडी · · पाककृती
Chilly Channa - 1 साहित्य १ कप चणे, रात्रभर भिजत घालून १ लसूण गड्डा, सोलून, बारीक चिरून १ मोठा कांदा, मोठे काप करून २ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या,मोठे तुकडे करून ४ ते ५ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून २ कांद्याच्या पाती, कांदा आणि पात वेगवेगळ्या चिरून ३ ते ४ चमचे टोमॅटो सॉस ३ ते ४ चमचे रेड चिली सॉस ३ चमचे सोया सॉस ३ चमचे व्हिनेगर २ चमचे काळीमिरी पावडर ४ ते ५ चमचे कॉर्नफ्लार मीठ चवीनुसार तळणी साठी तेल कृती चणे बुडतील एवढं पाणी घेऊन, चणे शिजवून घ्यावेत (कुकर मध्ये २ शिट्ट्या, किंवा मी मायक्रोवेव्ह मध्ये १५ मिनिटे फुल्ल पॉवर वर वाफवून घेतले). [चणे अगदी मऊसूद शिजवून न घेता, थोडेसे कमी शिजवून घ्यायचे आहेत] Step1  Step2 चणे शिजवून गार करुन, निथळून, कोरडे करून घ्यावे. ह्यात एक चमचा काळीमिरी पावडर, एक चमचा मीठ घालून ते हलवून घ्यावेत. Step3  Step4 आता ह्यात कॉर्न फ्लावर घालून, ते चण्यांना सगळीकडून लागेल असे हलवून घ्यावे. Step5  Step6 तळणी साठी कढईत तेल गरम करून, थोडे थोडे करून हे चणे तळून घ्यावेत (आच मध्यम ठेवावी, आणि काळजी घेणे, अधून मधून काही चणे फुटण्याची शक्यता असते). सगळे तळून झाले की बाजूला गार करत ठेवावेत Step7  Step8 वॉक किंवा कढईत, ३ ते ४ चमचे तेल गरम करून, त्यात बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा. ह्यात आता कांद्याचे काप टाकून ते एक तो दोन मिनिटे परतून घ्यावेत. Step9  Step10 आता ह्यात शिमला मिरचीचे काप टाकून ते २ ते ३ मिनिटे परतून घ्या. नंतर ह्यात कांदेपातीचा पांढरा आणि हिरवा भाग घालून ते अजून थोडे परतून घायचे आहे. Step11  Step12 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून अजून थोडा परतून घ्या. ह्यात आता सोया, टोमॅटो, आणि रेड चिली सॉस आणि व्हिनेगर घालून थोडा वेळ परतून घ्या. ह्यात उरलेली काळीमिरी पावडर घालून थोडं परतून घ्या. Step13  Step14 तळून घेतलेले चणे शेवटी घालून, मिश्रण परतून घ्या. चवीनुसार मीठ घालून, झाकण ठेवून, गॅस बंद करून, एक ते दोन मिनिटे ठेऊन द्या. Step15  Step16 गरम गरम खायला घ्या (चखणा म्हणून उत्तम)! [भाता बरोबर / व्हेज फ्राईड राईस सोबत खायचे झाल्यास, शेवटी, एक कप पाण्यात २ चमचे कॉर्नफ्लॉवर घालून, ते पाणी ह्यात घालून, मंद आचेवर ढवळून घ्या. ह्याने एक जाडसर ग्रेव्ही तयार होईल. असा ग्रेव्ही वाला चिली चना गरम भाता सोबत छान लागतो] Chilly Channa - 2

वाचन 22771 प्रतिक्रिया 0