मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

|| विठ्ठल अभंग ||

वैभवदातार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मी लिहिलेला अभंग ... विठ्ठला रे विठुराया रे पूजितो मी तुला चातुर्मास समाप्त आजि आलो दर्शनाला ||धृ || सावळे सुंदर रूप गोजिरे पाहतो मी डोळा विटेवरी उभा हात कटेवरी तुळशीहार गळा ||१ || दामाजीसाठी तू महार होसी जनाबाई चे दळण दळसी तुकारामांच्या गाथा तू तारिसी संत सज्जनांचे रक्षण करिसी ||२ || कार्तिकी एकादशी वारी येई भक्त मंडळींना दर्शनाची घाई पांडुरंगा तुझी अर्धांगी रखुमाई विठुमाऊली तू जगाची आई ||३ || चंद्रभागा तरी स्नान जे करिती त्यांची सर्व दुःखे पापे नष्ट होती षड्रिपूंपासूनि मुक्त ते होती टाळ मृदुंगांचा गजर करिती ||४|| अठ्ठावीस युगे उभा विटेवरी दुष्टांसी दंडूनी सुष्टांसी तारी नमितो वैभव आलो तुझ्या दारी घ्यावे दीनासी या तुझिया पदरी ||५|| --शब्दांकित (वैभव दातार )

वाचन 1997 प्रतिक्रिया 0