मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मश्रुम फ्राय

पगला गजोधर · · पाककृती
मश्रुम फ्राय साहित्य: १ मश्रुमचा चौकोनी पुडा (फूडबझार, स्टार, मोअर मॉल मध्ये मिळतो तो) (धुवून निथळून हलक्या हाताने कापडावर कोरडा करून कापावा ) ९ लाल ब्याडगी मिर्च्या (छोट्या कुकरमध्ये, उगा अंगभर पाण्यात १ शिट्टी घेऊन शिजवून, बिया देठं बाजूला काढून, साल मगज निथळून ठेवावे ) १ टी स्पून काळी मिरी १/२ टेबल स्पून आलं + १/२ टेबल स्पून लसूण १ टी स्पून फिश सॉस / ऑयस्टर पेस्ट १ टी स्पून व्हाईट व्हिनेगर १ टी स्पून साखर उगाच थोडं मीठ १ चक्री फुल (थोडा टवका खाऊन खात्री करा चक्री फुल कडू नसेल याची ) १ टेस्पून तेल (तीळ तेल किंवा कुठलंही प्रकारचं न्यूट्रल तेल वापरू शकता ) तीळ गार्निशसाठी ============================================================== पूर्वकृती : ९ लाल ब्याडगी मिर्च्या (छोट्या कुकरमध्ये, उगा अंगभर पाण्यात १ शिट्टी घेऊन शिजवून, बिया देठं बाजूला काढून, साल मगज निथळून ठेवावे ) नंतर शिजवलेल्या मिरच्या + आलं + लसूण + मिरे + साखर + मीठ एक चमचा पाणी टाकून मिक्सरमध्ये गंध वाटून घ्या... ================================================================== कृती: कढईत तेल मध्यम गरम करून त्यात चक्री फुल घालाव, सुगंध दरवळू लागताच त्यात, मिक्सरच्या भांड्यातली पेस्ट टाका, साधारण २ मिनिटे परतावे. (मिरची मिरे आलं लसूण) पेस्टचा सुगंध दरवळू लागताच त्यात, कापलेला मश्रुम टाकावा. उलथणीने मसाल्यात सगळीकडून माखून घ्यावा. व्हिनेगर व फिश सॉस शिंपडून मिनिटाभरच्यापेक्षा थोडं कमी परतत राहावं, गॅस बंद करा, तिळाने गार्निश करा. गरम पोळी / फुलका/ प्लेन राईस बरोबर सर्व्ह करावी. . mf

वाचन 8247 प्रतिक्रिया 0