हळद
लेखनविषय:
सगळ्यांच्या जखमा भरणारी हळद,
तिला मात्र जखमी करून जाते...
आजही ती कोणाच्या हळदीला जायचं
अट्टाहासाने टाळते...
जखमेवर हळद भरायची म्हटलं की
तिचे डोळे येतात भरून...
आजही.. हरितालिका पुजताना,
वटपौर्णिमेला मागणं मागताना,
कातर होते ती...
अंगाला लागलेली हळद
कोणाची..
कळेनासं होतं..
वेडावून जाते ती..
त्याने विनोद पाठवला
जखम होण्याआधी फक्त लग्नातच हळद लागते
तिचे डोळे भरून आले...
हळदीच्या विनोदानेच
जखमेवरची खपली काढली...
हळदीनेच होणाऱ्या जखमेवर उपाय काय.....
वाचन
1794
प्रतिक्रिया
0