मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे असंच चालायचं. ( आंदोलन मासिक फेब्रु.२००९).

कलंत्री · · काथ्याकूट
  • जगात ज्यांना पुरेसे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही असे ३३% म्हणजे ६५ कोटी लोक भारतात आहे.
  • अमेरिकेतही १३% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत आताच्या मंदीमुळे हे प्रमाण २०% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
  • १९८० च्या उत्त्पन्नात जी काही वाढ झाली, त्यातली ७० % वाढ फक्त १% कुटूंबीयांनाच मिळाली, त्यानंतर ही विषमता अधिक वाढत गेली.
  • १९९० च्या सुमारास १% श्रीमंत लोकांकडे ४२.२% शेअर्स, ५५.७ % बाँडस्, लहानमोठ्या उद्योगातील ७१.४ % उद्योग होते.
  • जगातील सर्वात जास्त श्रीमंत तिघाकडे जगातील ४८% पेक्षा जास्त श्रीमंती आहे.
  • जगातील सर्वात श्रीमंत अशा २२५ लोकांच्या उत्पन्नातील ४% अतिरीक्त कर वाढवला तर जगातल्या प्रत्येकाला अन्न, स्वच्छ पाणी, शिक्षण आणि आरोग्यसेवा देता येईल.
  • भारतात ५०% मुले कुपोषित आहे.
  • भारतातील बालमृत्यूचे प्रमाण बांगलादेशापेक्षा जास्त आहे.
  • २००३ साली भारताचा विकास क्रमवारीत १७५ देशात आपला क्रमांक १४७ वा होता.
  • १९९१ मध्ये टिस्को मध्ये ८५००० कर्मचारी १० लाखटन पोलादाचे उत्पादन करित. २००५ साली उत्पादन ५० लाख टन आणि कर्मचारी वर्ग मात्र ४४००० इतका झाला.
हे असेच चालायचे. सौजन्य : आंदोलन मासिक, फेब्रु-२००९. वार्षिक वर्गणी रु. १५० फक्त, संपादक - मेघा पाटकर. अवांतर : मुकेश अंबाणी आणि अनिल अंबाणी यांनी आपापल्या बायकांना विमान आणि जहाजाची भेट दिली त्यात तिनचार महानगराच्या पूर्ण रस्त्याबांधणीचा खर्च निघाला असता. भारतातील सर्व सोने आणि परदेशातील पैसा जर विकास कामासाठी वापरला तर भारतात कोणीच गरिब राहु शकत नाही. http://www.pustakvishwa.com/node/80

वाचन 19423 प्रतिक्रिया 0