मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निकाल : महाराष्ट्र दिन २०१७ - चारोळी स्पर्धा

साहित्य संपादक · · जनातलं, मनातलं
नमस्कार मंडळी, महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत. इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या. स्पर्धेतल्या तीन विजेते खालील प्रमाणे ~~~~~ प्रथम स्थान : उल्का महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा (टिप : आधीच जाहीर केल्याप्रमाणे या चारोळीला आजच्या बॅनरमध्ये स्थान देण्यात आले आहे) Banner ~~~~~ द्वितीय स्थान : राघव कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! ~~~~~ तृतीय स्थान : माम्लेदारचा पन्खा "हर हर महादेव" नाद गुंजता सह्याद्री बाहूंना स्फुरण चढे . . . . माऊलीहूनही मृदू होती ते महाराष्ट्राचे या उत्तुंग कडे ! ~~~~~ विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे आभार! यापुढेही वेगवेगळ्या उपक्रमांना आपण अशीच उत्स्फूर्त साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून स्पर्धेची सांगता होत आहे हे जाहीर करतो.

वाचन 20811 प्रतिक्रिया 0