मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

. चुंबन

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
व्ह्यालेंटाईन दिवस येत आहे.. चुंबन ही प्रणयातली आनंददायी क्रिया आहे.. चुंबनाचे सुंदर प्रकार आपल्या पुढे सादर करत आहे चुंबनाचे प्रकार. चुंबनाचे खालील प्रमाणे नीर निराळे प्रकार आहेत. जर आपणा पैकी कुणास यातला प्रकार आवडला तर आपण त्याचा प्रयोग करू शकता.आपल्या जोडीदार बरोबर * फुलपाख्ररु चुंबन-ह्या चुंबन प्रकारामध्ये प्रेयसीने तिचा चेहरा प्रियकराच्या चेहऱ्याचा एक श्वासांच्या अंतरावर आणावा. आणी त्याच्या नजरेत नजर मिसळून आपल्या डोंळ्यांच्या पापण्या फुलपाखराच्या पंखा प्रमाणे फडफडाव्यात. डोंळ्यांच्या पापण्यांचि फडफड ह्रदयांची फडफड वाढवण्यास समर्थ असते.. * मान चुंबन- हे एक मैत्रिपुर्ण. "तु मला खूप आवडतीस" प्रकारच चुंबन आहे. नुकतीच नवीनं ओळख होत असताना तिच्या खांद्यावर हात ठेवून हळुवार पणें आपलें ओठ तिच्या मानेंवर फिरवावेत * कर्ण पाकळी चुंबन- हळुवार पणॆ तिच्या कांनाचि पाळी [पाकळी] ओठांत घ्यांवी व ति पाकळी हळुवार पणॆं चुंबण्यास सुरवात करावी, जोरात आवाज करीत पाकळी चोखू नये. कान संवेदनाक्षम असल्याने आवाजा मुळे रसभंग होण्याची शक्यता आहे. * एक्सिमो चुंबन- तिच्या चेहऱ्याच्या जवळ चेहरा आणून आपलं नाक तिच्या नाकांवर हळुवार पणॆं घासावं..[एक्सिमो लोकात हि पद्धत खूप लोकप्रिय आहे] * तुहिनशर्करा {बर्फ} चुंबन- हे एक खूप मजेदार प्रकारचे चुंबन आहे. एक बर्फाचा तुकडा तोंडात घेऊन तोंड उघडत आपल्या जोडीदाराचे चुंबन घेत बर्फाचा तुकडा जिभेने तिच्या तोंडात सरकावा. व तिने पण जोडीदाराच्या तोंडात बर्फाचा तुकडा जिभेने त्याच्या तोंडात सरकावा...भडकलेल्या प्रणय ज्वाला बर्फ वितळविण्यास समर्थ असतात * सोनं पाऊल { पादाङगुलि } चुंबन- हि एक प्रणयाराधानांची क्रिया आहें. तिच्या टाचा जवळ घे‌उन टाचांचे चुम्बन घेत हाळुवार पणें तिच्या पायाच्या तळव्यांवर चुंबनाचा वर्षाव करावा. पायाला गुदगुल्या झाल्याने प्रणयाराधान करताना मजा येईल. ललाट {कपाळ} चुंबन- हे एक मैत्रिपूर्ण भावनांचे प्रतीक असलेले चुंबन आहे. समोरच्या व्यक्तीच्या कपाळांवर ओठ टेकवून हे चुंबन घेतले जाते, वात्सल्य व मैत्री भावाचे प्रतीक असणारे हे चुंबन आहे.. * फ्रेंच चुंबन-[ French Kiss]- ह्या चुंबन प्रकारांत दोनही जोडीदार जिभेचा वापर करतात. तोंड उघडून एकमेकांचे ओठ ओठांत घेऊन व एकमेकांच्या जिभेला जीभ लावत व एक मेकांच्या श्वासांची मुखातून देवाण घेवाण करीत हे चुंबन घेतले जाते. French Kiss या नांवानं हा चुंबन प्रकार जगांत ओळखला जातो. पण गंमत म्हणजे French लोक या चुंबन प्रकारास "The English Kiss". अस म्हणतात. * फल रसामृत चुंबन-एखाद्या फळांचा तुकडा दोन्ही ओठामध्ये पकडवा.[शक्यतो द्राक्ष, स्ट्रा बेरी, अननसाचा छोटा तुकडा, अंब्याची फोड अस रसाळ फळ असावं] व तिच चुंबन घेत तीच्या ओठांवर तो तुकडा चिरडतं रहावा.अर्धा तुकडा तोडत एक मेकांच्या मुखांतला रस एक मेकांच्या मुखांत सोडत चुंबन घ्यावे. * हस्त चुंबन... हळुवार पणें तिचा हात हातात घेत ओठ तीच्या हातांवर हळुवार पणें घासत तीच्या हाताचे चुंबन घ्यावे. कमरेत वाकुन हे चुंबन घ्यावयाचं असत. तीच्या बद्दल आदर दाखवण्यासाठी हा चुंबन प्रकार आहे ..पूर्वीचा राज घराण्यात हि पद्धत् होती * ओष्ठ व्रण चुंबन.... हे चुंबन घेताना तीच्या ओठांचा नाजुक पणें चावा घेत तिचे चुंबन घ्यावे. ओष्ठावर चाव्यांचा व्रण असल्यांन तीला कळत कि हे चुंबन स्वप्नातलं नसून सत्यांतलं आहे. * Avi

वाचन 9999 प्रतिक्रिया 0