अपुले प्रधानमंत्री मोदी
लेखनविषय:
('जगण्याचे भान हे' गाण्याच्या चालीवर रचलेले काव्य)
देशाचे प्रेम उसळले..
पाचशेचे नोटच गळले..
हजारला कीड लागली..
भ्रष्टांची गल्लत फसली..
मोदींचा निर्णय एकला....
भुरट्यांना केले कंगाल..
बॅंकांची भलती उलाढाल..
उधळून तो काळा पैसा शेठ मावळले....
अकलेचे झाड हे मोदी अपुले..
देशाचे हाड हे मोदी अपुले..
हम्म.. वट ती शेठांची झालीया फुसकी..
झालीया सार्या नेत्यांची मासकी..
जातच नाही गळ्यातून व्हिसकी..
काळी ती नोट निघाली नासकी..
नि:वस्त्र झाले..
भ्रष्ट पळाले..
मंत्र्यांनी सार्या..
टिकास्त्र फेकले..
भाजपचे प्रधानमंत्री स्तुतीने न्हाले..
अकलेचे झाड हे मोदी अपुले..
देशाचे हाड हे मोदी अपुले..
हो.. पांढरा रंग हा..
होतसे या नेत्यांचा..
झालिया बोंबाबोंब..
ऐन या रातीला..
शेठांचा पैसा काळा..
बसलाया त्याला आळा..
जनतेचे अच्छे दिन ते आज उगवले..
अकलेचे झाड हे मोदी अपुले..
देशाचे हाड हे मोदी अपुले.
वाचन
14313
प्रतिक्रिया
0