वैज्ञानिक दृष्टीकोण
चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती..
Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती..
Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय..
Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय..
Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं..
Computer वरील प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं..
वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला..
Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला..
विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय..
मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय..
Television वरील बातम्यांमुळे झाले वर्तमानपत्रांचे निधन..
जहाजांऐवजी विमानच झाले Import-Export चे साधन..
Mechanical Engineers ची Degree शेवटी कारकूनांना दिली..
अखेर वैज्ञानिक नजरेने महाराष्ट्राची राजधानी हस्तगत केली..
कारखान्यातील धूर पाहून तर देवांनाही घाम फुटला..
Shahrukh च्या Entry मुळे दादा कोंडकेंचा लेंगा सुटला..
वैज्ञानिक दृष्टीकोणामुळे झाले आहे मानवी हृदयाचे इंधन..
या जन्मावर या जगण्यावर विज्ञानाचे बंधन..
विज्ञान आपल्यासाठी आहे आपण विज्ञानासाठी नाही..
समाजाची गरज मानवी विज्ञान यांत्रिक विज्ञान नाही..
चला तर मानवी विज्ञानाचा घेऊ आपण ध्यास..
यांत्रिक विज्ञानाच्या मर्यादेचा करूयात पुन्हा एकदा अभ्यास...
वाचन
6343
प्रतिक्रिया
0