कधी असे ...
लेखनविषय:
कधी असे मलाही
वाटले होते
नभ हे मेघांनी
दाटले होते |
शिशिरात कसे
फूल उमलले होते
ओलावा शोधीत
मूळ पसरले होते |
भासले वळणावरती
कुणी थांबले होते
हात घेण्या हाती
मी ही चालले होते |
र्हुदयी या मायेने
गारुड घातले होते
सर्वस्वसही माझे
पणास लावले होते |
आत्म्यास मोहाने
असे जखडले होते
मार्गावरी माझ्या
काटे पसरले होते |
भय, लोभ, द्वेषा चे
रण पेटले होते
अंध अहंकाराने
चित्त गोठले होते |
कोलाहलात सार्या
गाणे हरवले होते
गर्दीने माणसाला
पुन्हा फसवले होते |
वाचन
2715
प्रतिक्रिया
0