मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गर्‍यांच्या पिठाची आंबीलः खास उपासासाठी!

अनन्न्या · · पाककृती
मे महिन्यात जेव्हा खूप फणस तयार होतात तेव्हा कच्च्या फणसाचे गरे सोलून बारीक चौकोनी फोडी करून वाळवले जातात. अगदी चांगले वाळले ही डब्यात भरून ठेवतात. या गर्‍यांचे पीठ केले जाते. हे पीठ चार पाच महिने चांगले टिकते. पावसातल्या उपासाला उपयोगी येते. अर्थात गर्‍यांचा थोडा वास कळतो. या पिठाची थालिपीठे, आंबील असे प्रकार होतात. साहित्यः एक वाटी ताक, एक वाटी पाणी, मीठ, दोन चमचे गर्‍यांचे पीठ, पाव चमचा जीरे, एक चमचा तूप, एक ओली मिरची, चिमुटभर साखर. फोटो आंतरजालावरून साभार. gare कृती: एका भांड्यात ताक, पाणी, मीठ एकत्र करा. हवी असल्यास साखर घाला. आता यात दोन चमचे गय्राचे पीठ नीट मिसळून घ्या. गोळी राहता कामा नये. या मिश्रणाला तूपाची जिरे आणि मिरचीची खमंग फोडणी द्या. मंद गॅसवर उकळायला ठेवा. ढवळत रहा. दाटपणा आला की गॅस बंद करा. गरमागरम प्या. नाचणीच्या आंबिली सारखीच लागते. कोथिंबीर वापरत असाल उपासाला तर वरून घाला. gare

वाचन 6502 प्रतिक्रिया 0