मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वीट न स्पायसी एग्

केडी · · पाककृती
Sweet n Spicy Eggs साहित्य ४ अंडी १ कांदा बारीक चिरून ५ ते ६ लसूण पाकळ्या, बारीक चिरून १/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून ३ ते ४ लाल सुक्या मिरच्या १ चमचा तिखट चिली सॉस १ चमचा सोया सॉस १ चमचा टोमॅटो सॉस १ चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर १ चमचा मध १ मोठा चमचा तेल मीठ, चवीनुसार Ingredients कृती नेहेमीची अंडा भुर्जी, बॉइल्ड एग भुर्जी खाऊन कंटाळा आलेला असेल तर हा एक थोडा वेगळा प्रकार करून बघा. थोडासा गोडसर तिखट असल्यामुळे मुलं आवडीने खातात. तिखट हवे असल्यास मिरच्या वाढवा किंवा तेलात हिरवी मिरची वापरू शकता. कांद्या ऐवजी कांदेपात वापरली तर चव अजून खुलेल. अंडी उकडून, सोलून त्याच्या गोल चकत्या कापून घ्या. पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लाल मिरच्यांचे तुकडे करून घाला. मिरच्या थोड्या परतून मग त्यात आलं, लसूण घाला. थोडा वेळ परतून मग चिरलेला कांदा घालून कांदा मऊ होऊं द्या. आता पॅन मध्ये, सोया, टोमॅटो आणि चिली सॉस घालून मिश्रण एकजीव करून घ्या. एक चमचा मध घालून ढवळून घ्या. अंड्यांच्या चकत्यांवर कॉर्नफ्लॉवर भुरभुरा आणि त्या हळुवारपणे पॅन मध्ये घाला. अलगद हाताने अंडी परतून मसाला सगळीकडून लावून घ्या. Step1 Step2Step3 Step4Step5 Step6Step7 चवीनुसार मीठ घालून, गरम गरम स्वीट न स्पायसी एग्स सर्व्ह करा!

वाचन 18141 प्रतिक्रिया 0