मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भरले tomato

मानसी मनोजजोशी · · पाककृती
साहित्य :- १. ४/५ छोटे tomato २. अर्धी वाटी ओल खोबर, ४ /५ लसूण पाकळ्या,अर्धा चमचा आल, १/२ हिरव्या मिरच्या व कोथिम्बीर एकत्रीत वाटून ३. १ चमचा गरम मसाला ४. १चमचा धने-जिरे पावडर ५. १ चमचा लाल तिखट ६. १ कान्दा बारिक चिरुन ७. अर्धा चमचा साखर ८.४/५ कढिपत्त्याची पाने ९. फोडणीसाठि - तेल, मोहरी, जिर, हिन्ग, हळद १०. मीठ चविनुसार १. tomato च्या देठाकडील भाग थोडासा कापून tomatoतिल गर काढून घ्यावा. २. खोबर,लसूण, आल, मिरचि व कोथिम्बीरीच्या वाटणात गरम मसाला, धने-जिरे पावडर , लाल तिखट, चमचा साखर व मिठ घालून एकत्रीत करावे. ३. गर काढलेल्या tomato मधे वरिल मिश्रण भरावे. ४. कढईत तेल गरम करून फोडणी करावी ५. त्यात कढिपत्त्याची पाने,बारिक चिरुलेला कान्दा घालून परतावे. ६. कान्दा गूलाबी झाल्यावर त्यात उरलेले वाटण घालून परतावे . ७. मिश्रणाला तेल सुटल्यावर भरलेले tomato व थोडेसे पाणी घालुन पून्हा परतावे व झाकण ठेउन एक वाफ आणावी. ८. tomato शिजल्यावर गॅस बन्द करावा. ९. कोथिम्बीर पेरून सर्व करावे.

वाचन 5206 प्रतिक्रिया 0