मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृँगार १६

अनाहूत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आजचा दिवस वाईट गेला , रात्री झालेल्या खराब झोपेमुळे मूडही खराब होता . दुपारी मंजूला फोन केला पण फारसं काही बोलली नाही ती . नेहमी इतकी बोलते , काही नाही तरी राग राग करते तस आज काहीच नाही . एकदम चुकल्या-चुकल्यासारखं वाटल . अशी का वागली असेल ती ? या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हतं . दिवसभर याच विचारामुळे कामातही लक्ष लागलं नाही . याच विचारात घरी पोहोचलो . मंजूला एक-दोनदा फोन केला तर तिने काही उचलला नाही . त्यामुळे मला आता जास्तच काळजी वाटू लागली . याच विचारात होतो तेव्हढ्यात मागे कोणाचीतरी चाहूल जाणवली म्हणून मागे वळून पाहीलं तर राधिका उभी होती . " अग तू ? कशी आहेस ? " " तुम्ही ठीक आहात ना ? बाहेरचा दरवाजा उघडाच आहे लॅच की तशीच अडकवली आहे . काळजी वाटली म्हणून पहायला आले . " " अग थोडा विचारतच होतो त्यामुळे लक्षात नाही आलं . " अस म्हणत मी चावी घेण्यासाठी बाहेर जाऊ लागलो . तेव्हढ्यात तिने माझ्यासमोर हात वर केला आणि हातातली चावी दाखवली . " ही घ्या आणि आता विचार न करता स्वस्थ बसा . मी पाणी देऊ का तुम्हाला ? " " नाही नको मी ठीक आहे आता . " " तुम्ही आजकाल टेरेसवरपण येत नाही . " " नाही गं , बस नाही येता आलं , थोडा बिझी होतो . " " कशात विचारात ? " " अगदी तस नाही पण नाही जमलं . " " इट्स् ओके एवढे काय एक्सप्लनेशन द्यायची गरज नव्हती . आता विचार नका करू आणि जाऊन जेवा आता . " " एवढ्यात ? " " कोणत्या जगात आहात ? मी जेवूनही आले . अजून थोडा वेळ केला तर बाहेर जेवणही नाही मिळणार . आवरा आणि या जेवून . " " हो . आवरतो माझं . पण वेळाच लक्षातच आल नाही माझ्या . " " असू द्या , आवरा आता . मी येते . " माझं काय चाललय ? किती वेळ झाला ते कळलही नाही असो आता येतो जाऊन . रात्री झोपायच्या आधीही फोन करावा का नको असा विचार केला . पण आज तीचं मन थोडं अशांत असायचं आणि मी त्यात सारखा फोन करायचो . याने तिला त्रासच व्हायचा . नको , आज नको करायला फोन . उद्या करू फोन . आजही रात्री झोपेचे तिन तेरा वाजलेले . सलग दोन दिवस वाईट झोप झाल्यामुळे सकाळी फारच वाईट मूड होता . पण तरीही सगळं आवरून ऑफिसला जायला निघालो . आधीच वाईट मुड होता त्यात पूजा समोरून आली . मला तिच्याशी आता अजिबात बोलण्याची इच्छा नव्हती . त्यामुळे तिला सरळ इग्नोर करत पुढे निघालो . तेव्हढ्यात तिने आवाज दिला " मला इग्नोर करता आहात का ? " " नाही , तस नाही जरा घाईत आहे . " पर्याय नसल्यामुळे फारसं थांबलो नाही तरी एवढ बोलावच लागलं . तीही सोबतच येत होती . " कुठे निघाला आहात ? " " ऑफिसला " " मीही येते आहे बरोबर . " " कुठे ऑफिसला ? " " अगदी तिथपर्यंत नाही पण काही प्रवास आपण सोबत करू शकतो ना . " मि तिच्याकडे वळून पाहील , ती माझ्याकडेच पहात होती . पण तरीही शक्य तितक्या कोरडेपणानेच तिला म्हटल ं " मला लेडीज कंपार्टमेंटमधे प्रवेश नाही मिळणार . " ज्याला फार कधी तोडून बोलण्याची सवय नाही त्याने तस बोलण्याचा प्रयत्न करणे किती हास्यास्पद होऊ शकतो हे आताच अनुभवत होतो . मला पटकन तस बोलायला काही सुचलं नसल्यामुळे काहीतरीच बोलून बसलो होतो . " पण आपल्याकडे फक्त जेन्टस् साठी अस वेगळ कंपार्टमेंट नसत ना , मी येऊ शकते ना तुमच्यासोबत . " " आता यावेळी ? खूप गर्दी असते . त्यात तू कशी येणार आहेस . " " होते हो जागा . " हे मात्र खर होत . अगदी कितीही गर्दी असलीतरी लेडीजला जागा होतेच . त्यामुळे माझ्याकडे आता कोणताही मुद्दा नव्हता . त्यामुळे आता तिचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता . स्टेशनवर पोहोचलो . लवकरच लोकल आली आणि फार प्रयास न पडता दोघांनाही आत जाता आलं . अपेक्षेपेक्षा हे फारच सोप झालं होतं . मी तिच्या शेजारीच पण सुरक्षित अंतर ठेऊन उभा होतो . तेव्हढ्यात तिने मला काहीतरी सांगण्यासाठी जवळ बोलावलं . आणि माझ्या कानात शेजारचा माणूस तिच्या फार जवळ येतो आहे अस सांगितलं . त्यामुळे मला आता तिला कव्हर करून उभ राहण आवश्यक होतं . त्या माणसाला थोडं बाजूला सरकायला सांगून मी तिच्या समोर उभा राहिलो आणि एक हात तिच्या बाजूने घेऊन तिच्या पाठीमागे असलेल्या बारला पकडला . आता ती ब-यापैकी प्रोटेक्टेड होती . येणा-या स्टेशनांवर गर्दीचा लोंढा आला की हातावर तो सगळा भार सहन करावा लागत होता . असं करत शेवटी उतरलो स्टेशनवर . ऑफिसला थोड्या वेळाने गेलो असतो तरी चालले असते पण मला थांबायच नव्हत म्हणून मी निघालो . तेव्हढ्यात ती बोलली " मला थोडं बोलायचं आहे तुमच्याबरोबर ." " अग आता उशीर होईल गं ऑफिसला . आपण नंतर बोलूया ना निवांत . " " मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा . प्लीज . " " ठीक आहे बोल . " " इथे असच ? थोड बसूया ना कुठेतरी . " " अगं आधीच उशीर होत आहे . बर चल . " ऑफिसकडे जाताना एक बाग आहे तिथे गेलो आणि मग तिला विचारलं " काय आहे एवढ महत्त्वाच जे तू इतक्या गडबडीच्या वेळी इतक्या गर्दीतून आणि इतक्या दूर आलीस ? " " कुठून सुरूवात करू हे समजत नाहीए . पण तुम्हाला उशीर होईल म्हणून पटकन सांगते . पण हे अस सांगायचं म्हणजे ..." माझ्या चेह-यावर अजूनही कोरडेपणाच आणि उशीर होत असल्याची सूचकता होती . त्यामुळं तिनं स्वतःला सावरल आणि बोलू लागली . " मला तुम्ही आवडता . का , कस , कधी माहीत नाही पण आवडता . " " माझ लग्न झाल आहे . " " हो . तुमचा तुमच्या बायकोबरोबर काय इशू आहे ते मला माहिती नाही . ते सॉर्टआऊट झाल तर चांगलच आहे . किंवा नाही झाल आणि तुम्ही पुढील आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त इतर कुणाचा विचार करणार असाल तरीही माझ काही म्हणन नाही . मी फक्त मला काय वाटत ते तुमच्यापुढे व्यक्त केल इतकच . तुम्ही आणि तुमची वाईफ अजून एकत्र असताना मी पुढच इतक बोलण तुम्हाला ठीक नाही वाटणार पण मला हे सगळ अश्यक्य झाल होत म्हणून तुम्हाला सांगाव लागल . तस हे मी स्पष्ट-अस्पष्टपणे सांगितलं होत पण एकदा हे पूर्णपणे सांगण गरजेच वाटल म्हणून हे सगळ ." ती घडाघडा बोलून मोकळी झाली . " इतर सगळं जाऊदे पण हे तू किती स्पष्टपणे सांगितलंस अगदी सगळ्या पर्यायांसोबत , किती मॅच्युअर आहेस . मी आतापण इतका मॅच्युअर आहे की नाही हे सांगता यायच नाही . बाकी तू जे सांगितलं त्यात आम्ही दोघे सोबतच आहोत त्यामुळे असा विचार मी नाही करू शकत . पण तू हे जस बोललीस त्यामुळं तुझ्याबद्दल फार रिस्पेक्ट वाटतो आहे ; आधीही होताच पण आता त्यापेक्षा जास्त वाटतो आहे . तू तुझा हा कॉन्फीडंस आणि स्पष्टपणा तुझ्या आयुष्यात , तुझ्या करीयरमध्ये आण तुला त्याचा फार फायदा होईल . " त्यावर तिने एक स्माईल दिली आणि पुढे म्हणाली " इट्स् ओके . पण आपण फ्रेंड्स म्हणून तर राहू शकतो ना ." " हो नक्कीच . पण एक सांग तू कधी एकेरी बोलते कधी अहो-जाहो . " " एकेरी अधिकाराने बोलते आणि ..." तिच्या पापण्या खाली झुकल्या , मानही किंचित खाली झाली . काही क्षणच तिची नजर खाली होती . मग ती तशीच वळली , अगदी मुद्दाम माझ्याकडे बघायच टाळल्यासारखी . आणि " येते मी " अस अस्पष्टस बोलत निघालीही . क्रमशः https://anahut10.blogspot.in

वाचन 15141 प्रतिक्रिया 0