मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(परिकथेतील राजकुमारा ...)

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज सकाळीच वंदना विटणकर याचे परिकथेतील राजकुमारा हे सुरेल गीत ऐकल आणि संध्याकाळी आम्हाला 'अल्पवयीन, संपुर्ण शारिरीक वाढ झालेला पण बौद्धिक वाढ अपुर्ण असलेला' अ.शे.मोगलगिद्दिकर यांचे ऐतिहासीक दस्ताऐवजांचा आभ्यासपुर्वक रुमाल वाचायला मिळाले.. आणि न राहून आम्ही हे गाणे गुणगुणायला लागलो परिकथेतील राजकुमारा खरडी सार्‍या बघशील का? काय चालले तरी मिपावर लेख तयाचा लिहिशील का? या नावांचे गूढ इशारे बघ ते वाचून जाणून सारे 'काल्पनिक ही' जरी म्हणोनी, तर्री आम्हा देशील का? खरडवही ही कुणी खरडली दिवसा रात्री नित्य उघडली त्या चर्चाची साक्ष अम्हाला, 'रुमाला'तूनी देशील का? हसून तुजला देतील टाळी प्रतिसाद ही देतील खाली कविजनांची एक सुपारी, हाता सरशी घेशील का? लाजवाब ही तुझी लेखणी दाखविले तू चित्र लोचनी नवटाकी या "केश्या"ची ही, कधी हजामत करशील का? केशवसुमार

वाचन 5080 प्रतिक्रिया 0