मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आम्ही -एक अंमळ वेडझवे

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मास्तर, हे तुम्ही सर्व फुकट का करता. कमीत कमी खर्च तरी घ्या. -इती ब्रिटीश आज रेतीबंदरावर बाल्या उर्फ ब्रिटीश भेटला. समोर दिसला, त्याला माझा प्रोजेक्ट सांगितला. मागे त्याने "मास्तर्,आमच्या पाड्याकडे पण बघा" असे प्रतिक्रियेत मला आवाहन केले होते. समोर दिसल्यावर ते वाक्य आठवले आणि म्हटले चला करुन टाकु. त्याला म्हटले, "बाल्या तुझ्या पाड्यावर इंग्रजी माध्यमाची शाळा आहे का? तो म्हणाला,"आहे की". चल, मग कामाला लाग. पाड्यावरच्या मुख्याध्यपकाला भेट आणि माझा कार्यक्रम ठेव. कार्यक्रम झाल्यावर मी त्यांना शेवटच्या महिन्यात तयारी वाढवण्याकरिता सराव परिक्षेचे पेपर देइन. ह्या सर्वाचा खर्च दर विद्यार्थ्यामागे सुमार साडेतीनशे असतो. पण पाड्याकरिता फुकट. त्याच्या चेहे-यावर "काय पण वेड्झवा माणूस आहे" हे वाक्य उमटलेले वाचले. असो. मिपावर असलेल्या सदस्याना विनंती: तुमच्या आजुबाजुला जर कोणी इंग्रजी माध्यमात किंवा सेमी इंग्रजी माध्यमात शिकणारे आपले मराठी विद्यार्थी असतील तर मला व्यंनि मधे कळवा. पोस्टेज सकट हे सराव पेपर त्यांच्या घरी पोचतील. हे पेपर अनुभवी शिक्षकांनी तयार केले आहेत. हा अनुभव आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोचवण्यास मला आनंदच होईल. ह्या सेवेचे कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही. हे करत असताना ज्या शिक्षकांनी मेहेनत घेतली आहे त्यांच्या कामाचे पैसे त्यांना पोचते करण्यात आले आहेत. (शिक्षकांना वाणी फुकट सामान देत नाही ह्याची जाणीव आहे मला) नेहेमीप्रमाणे ह्या कांमात मला रामदासांची मदत आहे हे वेगळे सांगायला नको. १. मॅथ्स १ मॅथ्स२ सायन्स १ सायन्स२ चे दोन सेट. २. संपर्क : व्यंनि. ३. पोस्टेज चा खर्च नाही. फक्त नाव, शाळा आणि घरचा पत्ता कळवा. ४. चर्चगेट ते पालघर व सी.एस्.टी. ते कर्जत्-कसारा मधील कुठलीही इंग्रजी वा सेमी इंग्रजी शाळा. ५. कितीही विद्यार्थी असले तरी चालतील. ब्रिटीश ला म्हटले, अरे बाबा, दर वर्षी ठरवतो पैसे घ्यायचे पण साला आतडे नाय म्हणते रे. काय करु. मागे एकदा सायन्स च्या प्रोजेक्ट मधे 'कॉमर्स चे काय करतो मास्तर बघु' अशी प्रतिक्रिया मी निर्विकारपणे झेलली होती. मीत्राचा राग काय मानायचा. राग ने येता त्या पासुन स्फुर्ती घेउन पुढच्या वर्षी कॉमर्स च्या विद्यार्थ्यांकरिता एक योजना राबवायची असे ठरले आहे. बघु, जमतय का? त्या अवलियाची इच्छा. मराठी माध्यमाच्या शिक्षकांकडुन तेवढे सहकार्य न मिळाल्यामुळे ' मराठी' माध्यमाकरता काही करु शकलो नाही ह्याचे वाईट वाटते. जाता जाता:मला ३ जण भेटले होते. सर्व मिपाकरांचे फोन नंबर विचारत होते. मी त्याना म्हटले " देणार नाही" तुम्ही त्यांना घरी जाउन भेटा. त्यांची नावे: सुख, शांती, आणि संपत्ती आम्हाला ह्या प्रोजेक्ट मधुन कुठलीही प्रसिद्धी वा नाव नको आहे. ते गुप्तच राहील.

वाचन 4731 प्रतिक्रिया 0