आता कुठ कुठ जायाच हनिमुनला
लेखनप्रकार
हे प्रकटन फक्त 'कोरी पाटी' करिता आहे. मुंबई स्थित नव दांपत्यांकरिता आहे.
मी हाताच्या फ्रॅक्चरने हनिमुनला जाउ शकलो नाही. ३ महिने घरीच होतो. नंतर का कुणास ठाउक नंतर जमलेच नाही.
आता कुठ कुठ जायाच हनिमुनला
लोणावळा, खंडाळा,
कोल्हापुरचा पन्हाळा,
बेंगलोर, गोवा नि काश्मिरला
सदाबहार रेखावर चित्रित हे गाणे लागले की अगदी 'जांबुवंत' जमान्यात लग्न झालेल्या लोकांच्या चेहे-यावर सुद्धा स्मित उमटवते. उसासे येउ लागतात. लोणावळा, खंडाळा हरकत नाही. बेंगलोर, गोवा, काश्मिर जरा जास्त लांब प्रवास होतो हनिमुन करिता असे मला वाटते.
खरेदी,देवक्,लग्न्,पाहुण्यांची जेवणे,सत्यनारायणाची पुजा ह्या चक्रात वधु आणि वर गांजलेले असतात. पुजेनंतर लगेच दुस-या दिवशी टू बाय टू बसमधे बसुन बेंगलोर प्रवासाचे प्रयोजन काय? बस वेळेवर पोचली नाही तर हालात आणखी भर. तिथुन परत ७ तास उटी. ह्या प्रवासात बस बहुधा लागतेच. रेल्वेची कुपे सिस्टीम फार कमी गाड्याना राहीली आहे आजकाल. आणि सिझन मधे रेल्वेची हवी असलेली तिकीटे फक्त पूण्यवंतांनाच मिळतात. (इतर प्लॅनींग पण असतेच की) अंगाखांद्याचे (मानेचे, पाठीचे वगैरे वगैरे) धिरडे करुन काय फायदा. तोटाच तोटा. पैशा परी पैसा करुनआणि प्रवासाचा त्रास घेउन काय मिळते. परत डी हायड्रेशनची भीती असतेच. बहुधा नावाचाच हनिमुन होतो. जवळात जवळ जावे हनिमुनला. प्रवासाचा अतिरिक्त त्रास नसल्यामुळे जोडपे कसे फ्रेश रहाते. आणि उटीचे 'बॉटॅनिकल गार्डन" असो वा माथेरान ची बाग असो त्यांना काय फरक पडतो.
अशा वेड्यावाकड्या प्लॅनिंग मुळे फसलेला हनिमुन मला ब्-याच वेळा कानावर आला आहे. नविन लग्न असताना त्याचे काही वाटत नाही. पण साधारण ४ वर्षाने टोमणे द्यायला आणि घ्यायला सोय होते.
जाता जाता: लग्नाची सिल्वर ज्युबिली आणि पहिला हनिमुन 'रॉयल पॅलेस ऑन व्हील्स' वर करायचे ठरवले आहे. साधारण १ लाख रुपये लागतील. पण अजुन ३ वर्ष हातात आहेत. साठवीन हळु हळू. रॉयल सुट्स असतात म्हणे.
वाचन
7394
प्रतिक्रिया
0