मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आंतरजातीय विवाह

निकुंज · · जनातलं, मनातलं
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला. कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत. नेहमीच लग्नाच्या रस्त्यात ही जात, काळ्या माजरा सारखी आडवी का येते अजुनही मला काळल नाही. आणि नेहमीच मुलाला किवा मुलला दहा पावले मागे घ्यावी लागतात. पण ही दहा पावले त्याचं आयुष्य त्यांना एव्हड मागे घेऊन जातात की तीथुन त्यांना पुढे येन अवघड होऊन बसत. पेपर मधुन, पुस्तकातुन खुपवेळा समानते बद्दल वाचाल आणि ऐकल आहे. पण हे विचार अजुनही फक्त पुस्तकातच आहेत. भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक

वाचन 14349 प्रतिक्रिया 0