गुळाच्या पोळ्या
साहित्यः
१/२ किलो गुळ (चिक्कीचा गुळ नाही ना याची खात्री करून घ्या.)
१/२ वाटी डाळीचे पीठ
१/२ वाटी साजुक तूप
१/४ वाटी तीळ
१ टे.स्पून प्रत्येकी भाजलेली खसखस व खोबर्याचा कीस
१ टी.स्पून वेलदोडा पूड
१ टी.स्पून जायफळ पूड
२ वाट्या कणिक, १ वाटी मैदा,पाव वाटीपेक्षा थोडे कमी डाळीचे पीठ, १ टे.स्पून तेल,१/२टी.स्पून मीठ, चिमूटभर हळद, लाटायला तांदळाची पीठी.
कृती:
एका कढईत गुळ चिरून घ्यावा. त्यात २ टे.स्पून पाणी घालून गॅसवर ठेवून विरघळून घ्यावा. मंद गॅसवर सतत हलवत राहावे व गुळ विरघळल्याबरोबर गॅस बंद करावा.
तुपावर डाळीचे पीठ खमंग भाजून घ्यावे, तेही गुळात ओतावे.
तीळ, खसखस व खोबरे वेगवेगळे भाजून बारीक करून घ्यावे.( मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात मोठ्या स्पीड वर तेल सुटेपर्यंत बारीक करावे.)व ही पेस्ट गुळात घालावी.
आता वेलची, जायफळ घालून गुळ ढवळावा. एकजीव करावा व थंड होऊ द्यावा.
आता कणिक,मैदा,डाळीचं पीठ, मीठ, हळद एकत्र करावे व त्यात गरम तेलाचे मोहन घालून नेहमीसारखी कणिक भिजवावी व चांगली मळावी.
कणकेचे लिंबाएवढे गोळे करावे व त्याच्या हाताने पार्या कराव्या. गुळाची गोळीही तेवढीच दाबून चपटी करावी व दोन पार्यात ठेवून पार्या बंद करून पीठीवर पोळी शक्य तेवढी पातळ लाटावी.
गुळाच्या पोळीला शक्यतो नॉनस्टीक तवा घ्यावा, म्हणजे गुळ बाहेर आला तरी चिकटत नाही.
पोळी कमी मध्यम आचेवरच भाजावी. एकदाच उलटावी. कारण पटकन करपू शकते.
भाजलेल्या पोळ्या कागदावर पसरून पूर्ण गार झाल्यावरच डब्यात भराव्यात.
१/२ किलोच्या प्रमाणात २० पोळ्या होतात.
वाचन
7145
प्रतिक्रिया
0