मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( ६४ कलेत पारंगत )

अमोल केळकर · · काथ्याकूट
~X( ( ६४ कलेत पारंगत ) अविनाश साहेबांनी दिलेल्या पारंपारिक ६४ कलांची माहिती मिळाली. आणि आधुनिक कला काय असाव्यात याबाबत विचार केला. कृ. ह. घ्या. आपल्याला काही यात बदल वाटल्यास अवश्य सुचवा . १ लिटिल असतानाच चॅम्पस होण्याची कला (गायन कला ) =D> २ गाड्यांचे हॉर्न वाजवण्याची कला (वाद्य वाजवण्याची कला,) ३ मिरवणूकीत / वरातीत अंगविक्षेप करण्याची कला ( नृत्यकला ) ४ महागुरुंना प्रसन्न करुन घेण्याची कला ( गात, वाद्य वाजवत नृत्य करण्याची कला ) ~X( ५ ब्लॉगिंग/ हुसेन स्टाईल कला ( लेखन व चित्रकला ) ६ गझनी स्टाईल कला (गोंदण कला [ टॅटु काढण्याची कला ] ) ७ सर्व कामांसाठी कॉन्ट्रॅक्ट देण्याची कला (बिछाने,घालणे, फुलानि सजवणे, व फुलांच्या रांगोळ्या चि कला ) ८ रानडे रोड/ तुळशीबाग्/फॅशन स्ट्रीटवर जाण्याची कला (दांत, कपडे,शरीर, नखें रंगवण्याची कला ) ९ वास्तुशास्त्राच्या नावने विनाकरण घराची डागडुजी करण्याची कला (भिंतित, व घरातल्या जमीनी वर रंगीत आरसे, काचा फिक्स करण्याची कला ) १० जर्बेरा पुष्प लावण्यासाठी प्लॉवर पॉट निवडण्याची कला (पुष्प रचना करण्याची कला ) ११ गालिचा, दिवाणखान्याचे चित्र वॉलपेपर म्हणून सिलेक्ट करण्याची कला . (गालिचे दिवाणखान्यात पसरणे, साफ करणे, इ कला ) १२ मोबाईल रिंग टोन सेट करण्याची कला (जलतरंग वाजवण्याची कला ) १३ वेगवेगळे फिल्टर / फ्रिज घरी आणण्याची कला (पाणी भरुन, त्याचे साठवण , व वापर करण्याची कला ) १४ गृह सजावटीसाठी घरात थांबण्याची कला (चित्रे काढुन, गृह सजावट करणे.) :) १५ अवांतर प्रतिसाद देऊन प्रतिसाद वाढवण्याची कला (दो~यात फुले ओवुन, पुष्प माला, गजरे, माळा तयार करण्याची कला ) १६ नालायक पुरुषांना फाट्यावर मारण्याची कला (पुरुषांच्या फेट्यावर, फुलांची सजावट, व तुरे करण्याची कला) =P~ १७ आय पॉड ची वायर कानात बरोबर अडकवण्याची कला (कर्ण दागीनें [फुले] करण्याची कला ) १८ पदोपदी आपली भुमिका बदलण्याची कला (नाटकात, एखादे पात्र सादर करण्याची कला) १९ प्रदुषणापासून वाचण्यासाठी मास्क वापरण्याची कला (अत्तरे, सुगंध तयार करण्याची कला ) २० वस्त्र नेसून फॅशन शो मध्ये भाग घेण्याची कला (वस्त्र प्रावरणे, घातल्यावर, त्यावर योग्य दागिने, घालुन नटवण्याची कला.) २१ आयते मिळवण्याची कला (जादु करण्याची कला ) २२ ह्स्तालोंदन करुन स्वागत करण्याची कला / हात धुण्याची कला (हस्त लाघव ) २३ दर आठवड्याला नवीन हॉटेलात जाण्याची कला (सॅलद,कोशिंबिरी,चपात्या, अन्न बनवण्याची कला ) :| २४ सासू सून मालिका चालू असताना ध्यानस्त रहाण्याची कला ( ---- ) २५ कॉक्टेल ट्राय करण्याची कला (पेय, सरबत ई..बनवण्याची कला ) २६ भरत जाधवचे चित्रपट सहन करण्याची कला (विणकाम, भरत काम... ) =D> २७ सुत्र क्रिडा २८ विणा पाटील यांच्या केसरी टुर्स च्या जहिरातीपासून वचण्याची कला (विणा डमरु वाजवण्याची कला२९ कोडे,[पहेली] घालुन सोडवण्याची कला) ३० कॉपी पेस्ट मारण्याची कला (पाठांतर कला ) ३१ ग्रंथालया सारख्या ऐतिहासिक वास्तुला महिन्यातून एकदा भेट देण्याची कला (पुस्तक वाचण्याची कला ) ३२ गृह संस्थेचा सभासद होण्याची कला (लहान नाटुकल्यात काम करण्याची कला) ३३ मला माहित नाही हे न समजुन द्यायची कला (काव्य समास, आणि विग्रह कला ) ३४ रस्त्यावरच्या लाकडी वस्तूंनी घर सजवण्याची कला (वेत/बाम्बु पासुन बाण, ढाल ईत्यादि करण्याची कला ) ३५ नेटवर्क मार्कॅटिंग पासून दूर रहाण्याची कला ( पिंजण कला ) ३६ सुसाट गाडी चालवण्याची कला ( सुतार कला ) ३७ फेंगशुई ( वास्तु विद्या ) ३८ गेट, सेट , सिईटी इ. परीक्षा (रुप/रत्न परीक्षा..ची कला) ३९ चाटु विद्या ( धातु विद्या ) ४० दागिने घेण्याची कला (दागिने रंगवण्याची कला ) ४१ जीम जॉइन करण्याबद्दल विचार (आकार ज्ञान ) ४२ प्रोटीन पावडर, हॉर्लिक्स , शक्तीवर्धक गोळ्या ज्ञान (जडि बुटी औषध विज्ञान ) ४३ गल्लीतल्या कुत्र्यांशी रात्री ९ नंतर मुकाबला करायची कला ( कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला ) B) ४४ ब्रेकिंग न्यूज दुर्लक्षीत करण्याची कला (पोपट व मैनेचे संभाषण जाणुन घेण्याची कला) ४५ रामदेव बाबांची आसने आचरणात आणण्याची कला (पुष्पौषधी नी हिलिंग करण्याची कला ) ४६ ब्युटी पार्लर शोध कला (केश रचना कला ) ४७ मोबाईलवर कॉन्फरन्स आणि इंतरनेटवर चॅटिंग करण्याची कला (अक्षर आणि मुद्रानि संभाषण करण्याची कला) :)] ४८ लोड शेडिंग मधे टि.व्ही शिवाय बसण्याची कला ( -------- ) ४९ मराठी भाषा शुध्द लेखनासहीत शिकण्याची कला (देश भाषा ज्ञान) ५० फुलां पासुन खेळणी बनवण्याच ज्ञान ५१ पत्र लिहिण्याची कला ( यंत्र ज्ञान ) ५२ वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्याची कला (शुभेछ्या देण्याचे ज्ञान) ५३ लोकलची ३-४ थी सिट मिळाल्यावर करावयाचे संभाषण ( संभाषण कला ) ५४ बर्‍याच गोष्टी मनोमनीच करण्याची कला (मनातल्या मनांत काव्य करण्याची कला ) :)) ५५ कौल लावण्याची कला (क्रिया विकल्प ज्ञान ) ५६ अलिबागला जाऊन पर्यटनाची हौस भागवण्याची कला (चलितका योग) ५७ माहिती मिळण्यासाठी गुगलून काढण्याची कला (अभिदन कोश विद्या ) ५८ वस्त्र घालण्याची कला (वस्त्राने झाकुन [कव्हर] ठेवण्याची कला) 8| ५९ शेअर मार्केट ज्ञान ( द्युत क्रिडा ज्ञान ) ६० लॅटो/ लॉटरी खेळावयाचे ज्ञान (फसे टाकुन सोंगट्या खेळावयाचे ज्ञान ) ६१ लहान मुलांकडून कॉम्प्युटर / मोबाईल गेम शिकण्याची कला (लहान मुलांच्या खेळण्या विषयीचे ज्ञान ) ६२ पुण्यात वाहन चालवण्याची कला (विनायकि विद्या..शिस्त लावण्याची कला ) ६३ मीच शहाणा/शहाणी हे सांगण्याची कला (जिंकण्याची कला ) =D> ६४ सततच्या आरडओरड करुन नवर्‍याला काबुत ठेवण्याची कला (मधुर संगीताने आपल्या मालकाला जागे करण्याची कला ) O:)

वाचन 4585 प्रतिक्रिया 0