तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा
काव्यरस
मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही. परंतु मराठी विकिपीडियाच्या मराठी विक्शनरी या (ऑनलाईन शब्दकोश) बन्धू प्रकल्पासाठी
१) मराठीच्या बोलीभाषांमध्ये असलेल्या पण प्रमाण मराठीत न वापरल्या जाणार्या शब्दार्थांची नोंद घेणे.
२) एखाद्या (कोणत्याही) शब्दास प्रमाण मराठीत वापरात नसलेला पण बोलीभाषेत असलेल्या समानार्थी शब्दांची नोंद घेणे
* किमान शब्दार्थ तर नोंदवावेतच पण शक्यतोवर वाक्यात उपयोगाची उदाहरणे आणि जाणकार असल्यास व्याकरण विषयक अधीक माहितीही आवर्जून नमुद करावी.
* हे या धाग्याचा मुख्य उद्देश आहेत. धागा महाराष्ट्र आणि बृहनमहाराष्ट्रातील सर्व बोलीभाषा आणि तदनुषंगिक भाषा विषयक चर्चेसाठी आहे. तेव्हा एखाद्या बोलीभाषेचे नाव यादीत नसलेतरीही चर्चा करता येऊ शकेल तसेच यादीत जोडण्यासाठीही आपण सुचवू शकता.
*मालवणी, बेळगावी, चित्पावनी, कदोडी / सामवेदी, झाडीबोली, नागपूरी, अहिराणी, तावडी, चंदगडी, वऱ्हाडी, देहवाली, कोल्हापुरी, कोकणी, आगरी, तंजावर, जुदाव, लेवा, मराठवाडी, गोंडी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, कैकाडी, वाडवळ / वडवली/ळी, डांगी, गोरमाठी, मोरस मराठी
**यादीत नसलेली या बोली भाषांची नावे मिळाली काणकोणी, नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडीया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, 'आरे मराठी', जिप्सी बोली(बंजारा), कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, ढोरकोळी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी यातील नावे यादीत जोडावी वाटल्यास प्रतिसादात नोंदवावे. (बोलीभाषांची नावे बोलीभाषा या नात्याने आंतरजालावरील जाणत्यांच्या नोंदीतून घेतली आहेत. काही ठिकाणी अपरिहार्यतेने जातींची/समाजांची नावे दिसत असलीतरी येथील उल्लेख केवळ भाषिक उद्देशाने आहेत जातीय उद्देशाने नाहीत.)
*धाग्याचा मुख्य उद्देश विकिप्रकल्पासाठी असल्यामुळे या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.
* एक पेक्षा अधिक बोलीभाषा येत असल्यास आपणास ज्या बोलीची माहिती अधिक आहे ती नोंदवावी
* सूची:मराठी बोलीभाषांमधील शब्द अद्याप स्वतंत्र सूची तयार न झालेल्या बोलींकरताची सामायीक सूची.
* सूची:कोल्हापूरी_बोली
* सूची:कोकणी भाषा
* सूची:चित्पावनी बोलीभाषा
* सूची:कादोडी बोली/ सामवेदी बोली
* सूची:वाघ्ररी बोलीभाषा/वाघरी
* सूची:कोलामी बोलीभाषा
*एथनालॉग कोड कोकणी [knn], वर्हाडी-नागपुरी [vah], गौळण [goj] सामवेदी [smv] अहिराणी [ahr], Bhalay [bhx], Far Western Muria [fmu], गोवळी [gok], Indo-Portuguese [idb], कतकरी [kfu], खानदेशी [khn], कोरकु [kfq], Korlai Creole Portuguese [vkp], Lambadi [lmn], Mawchi [mke], Nihali [nll], Noiri [noi], Northern Gondi [gno], Northwestern Kolami [kfb], Palya Bareli [bpx], Pardhan [pch], Pauri Bareli [bfb], Powari [pwr], Rathwi Bareli [bgd], Seraiki [skr], Tulu [tcy], Vaagri Booli [vaa], Varli [vav], Vasavi [vas], Waddar [wbq].
देवीचे खुळ : " बोल, वळेखन माऊली की जय....
माऊली मातानू वट्यापर पुजा करवा लाग्या होता...
देस्तान मारा माऊली मातान खंदुर लागव करी मनक्या,
ये मारा माऊली ना शरण व देवो दयाळी मारा व बाई ...
इंद्रसभा करी मारा आई व...2 ये बोली त बोलो बोल मारा भाई....
तारु नाम लवू मारा आई..तारा गायन करु मारा आई..
येलकाऱ्या मान मनक्या होतो, खुराळ्याना घरमा पावन होती आई..
खुराळ्यानी इंद्रसभा भरी होती या खुराळ्याना घरमा खेलती आई..
ये लागो लिला मारा व आई.2 तारा नाम लवू मारा देवी व.... आई बुन्ना बेका होता आई....
आई देस्ताना दोन पातर कऱ्या होत्या, पण इंद्रसभा बेखी होती
जण बहा पण देस्ताना भक्ती चली होती ये देस्ताना हुंमडा पडलाग्या आई...
न्हाना मोठानू देस्तान थायो मारा आई व थायो लीला मारी व आई.......
बोल वळेखन माऊली की जय.....
*सौजन्य: मराठी विकिपीडिया
**हे टाकणकार समाजातील देवीचे खुळ आहे, वाघ्ररी या मराठीच्या बोली भाषेतील हे लोककाव्य सतिश मालवे या मराठी विकिपीडिया सदस्याने मराठी विकिपीडियावर आणले होते.
**या काव्याचा मराठी विकिप्रकल्पांकरता अनुवाद करून मिळाल्यास हवा आहे. ह्या धाग्यावरील लोकभाषा/बोलीभाषा विषयक प्रतिसाद आणि अनुवाद प्रताधिकार मुक्त होत आहेत असे गृहीत धरले जाईल. प्रतिसादांसाठी धन्यवाद
वाचन
10598
प्रतिक्रिया
0