मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शनीशिंगणापूरातून ग्रामस्थांनी बाहेर पडावे काय

खटासि खट · · काथ्याकूट
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी दुसरी बाजू न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात " स्वामी अस्वस्थानंद रसवंती" हे नाव चर्चेत येत आहे . स्वामीजींची भेट झाली. त्यांच्याबद्दल नेटवर वैयक्तिक जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे. त्यांनी चर्चेत खालील मुद्दे उपस्थित केले. शनीच्या चौथर्‍यावर जाणाराने सहा महीने कुठल्याही महिलेशी संपर्क करणे निषिद्ध आहे. शास्त्राप्रमाणे हा कालावधी सहा वर्षे आहे. पण ट्वेन्टी ट्वेन्टीच्या जमान्यात तो शिथिल झाला आहे. ज्या गावामधे शनीचं पूजन करण्याची किंवा त्याचं मंदीर असण्याची परंपरा आहे त्या गावात स्त्रियांना मनाई आहे. सबब गावातील पुरूषांना लग्न आदि विधी मधे सक्रीय सहभाग नोंदवणे शास्त्रास धरून नाही. तसेच गावातील ग्रामस्थांनी वेस ओलांडू नये याचे कारण वेशीच्या बाहेर स्त्रीच्या स्पर्शाने विटाळ झालेली भूमी असेल त्याचे कण पायास लागून गावामधील भूमीस विटाळ होतो. त्यातून निघणा-या तमोगुणांमुळे शनीमहाराजांचा कोप होण्याची शकता असते. शनी या ग्रहाचा नऊ या क्रमांकाशी संबंध असल्या कारणाने त्याचे शून्याशी जमत नाही. कारण शून्य नंतर आलेले आहे. त्यामुळे नऊ, एकोणीस असे अंक शनीमहाराजास चालू शकतात. परंतु दहा किंवा वीस हे अंक निषिद्ध आहेत. या अंकाचा उल्लेख नावात असलेली व्यक्ती देखील शनीमहाराजांना चालत नाही. त्यामुळे या गावावर अशा व्यक्तीची सत्ता नको. वरील धोक्याची घंटा पाहता राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ? आपल्याला याबद्दल काय वाटते ? मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा आणि त्यासोबत नव्यानेच उजेडात आलेले शास्त्र पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीचे गाव असलेली वेस ओलांडून जाण्याचे कारणंच काय ? सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....

वाचन 5961 प्रतिक्रिया 0