वऱ्हाडी लोकगीत -उचाट नागोबुढा
काव्यरस
इयत्ता पाचवीत शाळेतल्या संगीत शिक्षकांकडून शिकलेलं व आजही तोंडपाठ असलेलं एक वऱ्हाडी लोकगीत.
माझे योगदान केवळ टंकण्याचे.
------------------------------
पावसानं इचीबहीन कहरच केला
गावच्या नदीले पूरच काय आला
अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला
बुढीबी बाप्पा भल्ली गया काढून रडे
अन खोपड्यामध्ये इचीबहीन उठू उठू पडे
यक जन पलीकडे जाऊन बी आला
अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला
नागोबुढा पोरीच्या घरीबी गेला
अन तुपासंगं पोयी खाऊन बी आला
तरी म्हने यक रस राहूनच गेला
अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला
पायटी पायटी बुढा कानी गावातची दिसे
अन लोकाईकडे पाहून गालातची हसे
लोक म्हने काबे काऊन नाही मेला
अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला
------------------------------
वाचन
6322
प्रतिक्रिया
0