मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें

पगला गजोधर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माननिय गुर्जी यास, प्रेर्ना बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें, तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें ! काय म्हणता ? 'बायको' हे प्रकरण नक्की कांय असतें ? अहो दशरथ असो वा राघोबा, असो परवाचा आमिर, युगानुयुगे हे कोणालाही न कळले दिसतें, पन तरिही तुमचं वा त्यांचे अगदी 'सेमचं' असतें ! रुसली तर रुसू दे, भडकली तर भडकू दे ! तरीसुद्धा तरीसुद्धा, तुम्हाला म्हणुन सान्गतो बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें, तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें ! एखाद्याची वेळ भरता, मनी लग्नाचे धुमारे उमलू लगतात संसाराच्या हळदीची पुटं त्याच्या मेंदूवर साचू लागतात । आठवतं ना ? तुमची लग्न घटिका जेव्हा, भरली होती, "सावधान" म्हणून भटाने खरंच लाश्ट वॉर्निंग दिली होती ! पण तरीही आंतरपाटामधून बेभान होऊन तुम्ही काहीतरी शोधत होता, चौड्यावर उभे राहील्याने पडता पडता वाचला होता ! कोणालाच तेव्हा कळत नसतं, आम्हालासुद्धा कळलं नव्हतं ! बेसावध क्षणी हळुवारपणे 'ती' आयुष्यात उतरू लागते, 'व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते झाले' पुस्तकाबाहेरचा धडा लाइफ शिकवू लागते, पण, 'तोफ बरसली कि खंदकात लपून वाचण्याची' प्राक्टीस आपण करायची असते, आणी ती करता करता कधीही तोंड उघडायचे नसते, त्यावेळी तसंही आपल्या हाती आणखी काय उरलेलं असते ? कारण बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें, तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !

वाचन 6715 प्रतिक्रिया 0