सांताक्लाॅज ही अंधश्रद्धा आहे?????
सांताक्लाॅज ही अंधश्रद्धा आहे?????
...............................................
यावर खूप पुर्वी सिनेमा पाहिला ..त्याचे कथानक साधारण असे....सिनेमाचे नाव आठवत नाही
सिनेमा नायक वकील असतो..
त्याचा वकील मित्र त्याच्या घरी नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेला असतो..
हीरो वकिलाचा मुलगा बाबाच्या मित्रांना संटा नी दिलेली खेळणी दाखवत असतो..
मित्र गमतीत मुलाला म्हणतो."संटा असे काही नसते बाबाच खेळणी आणुन ठेवतात व मुलांना देतात"
यावर तो लहान मुलगा गडबडतो..व बाबांना विचारतो..यावर हीरो बाबा म्हणतात.."संटा असतो व तोच खेळणी खाऊ मुलांना देत असतो"
यावर दोनही वकिलांची जुंपते...
आपल्या मुलाचे निरागस भावविश्व जपण्यासाठी हीरो बाबा "संटा असतो व तोच खेळणी खाऊ मुलांना देत असतो" असा पवित्रा घेतो तर मित्र वाकील हि गोष्ट कायद्याने सिद्ध करण्याची आव्हान देतो..
मजे मजेत चाललेल्या गप्पा गंभीर वळण घेते..व वाकील मित्र हीरो वकिलाला " संटा हि काल्पनिक व्यक्ती नसून खरी खुरी व्यक्ती होऊन गेली आहे/अस्तित्वात आहे " असे सिद्ध करण्याचा दावा कोर्टात दाखल करतो..
या खटल्याने अमेरिकेत खळबळ माजते..लहानगी मुले आई बाबा ना "संटा आहे ना?" असे प्रश्न विचारतात..आई वडीला ची पण पंचाईत होते नेमके काय सांगावे हेच त्यांना कळत नाही..
खटला उभा राहतो..
हीरो वकील अनेक दाखले श्रद्धा यांचे दाखले देतो..पण वकील मित्र त्या सा~या पुराव्याच्या चिंध्या उडवतो..
हीरो वकिलाला पण माहीत असते संटा हि काल्पनिक व्यक्ती आहे...
शेवटी कोर्ट हीरो वकिलास म्हणते " कायद्यास मंजूर होतील असे पुरावे द्या जसे सरकारी दस्त ऐवज इत्यादी लोककथा..आदींना कायद्यात स्थान नाही.."
हीरो वकील वेळ मागतो..ख्रिसमस जवळ आलेला असतो..
हीरो प्रयत्न करीत असतो पण त्याला पुरावे मिळत नाहीत कसे मिळणार ??शेवटी संटा हि काल्पनिक व्यक्ती आहे..
शेवटी त्याला एक कल्पना सुचते..
२३ डिसेंबर येतो..प्रतिपक्षाचा वकील..केस मध्ये दम नाही हीरो वकील पण घाबरून गैर हजर आहे..असे सांगून जज साहेबांना निकाल निवाडा करायची विनंती करतो...
कोर्टा बाहेर हजारोंच्या संख्येने लहान मुले व त्यांचे आई बाबा डोळ्यात प्राण आणून जज साहेब काय निर्णय देतात ते पाहण्या साठी उभे असतात..
निकाल काय होणार हे आई बाबांना व सर्व प्रौढांना माहीत असते..
जज साहेबां ची पण गोची झालेली असते.. " संता काल्पनिक व्यक्ती सांगावे तर जगातल्या लाखो करोडो मुलांचे भाव विश्व कोलमडून पडणार असते...
व संटा आहे" असा निर्णय दिला तर ति कायद्याशी केलेली प्रतारणा होणार...
जज साहेब व्हर्डिक्ट देणार तेवढ्यात हीरो वकील कोर्टात येतो...
व जज साहेबांना आपण कायदेशीर पुरावा आणला असे सांगतो..
बाहेर व आत सारी लहान मुले व आई बाबा आनंदाने कल्लोळ करत असतात..
हीरो वकिलाच्या मागे पोस्टमन खांद्यावर पत्रांच्या ब्यागा घेऊन प्रवेश करतात..व हीरो वकील जज साहेबांच्या टेबलावर पोस्टमन ना त्या ब्यागा उपड्या करायला लावतो...
ति लहान मुलांनी संटा ला लिहिलेली ति पत्रे असतात व त्या वर "सॅंटा क्लॉज" असे लिहिलेले असते..
व पत्रावर "अमेरिकन पोस्टाचा स्टॅंप असतो..
हीरो वकील ऑरग्युमेंटला उभा राहतो व आपली बाजू मांडताना युक्तिवाद करतो..
"अमेरिकन पोस्ट हे लोकनियुक्त सरकारचा उपक्रम आहे..पोस्ट व सरकार जर लाखो पत्रावर केवळ ""सॅंटा क्लॉज" असे लिहिले असताना पत्रे "सॅंटा क्लॉज" पर्यंत पोहोचवतो याचा अर्थ सरकार व पोस्ट "सॅंटा क्लॉज" आहे असे मानते व तो सरकारी पुरावा म्हुणुन ग्राह्य धरावा असे सांगतो"
हीरो वकिलाच्या बिनतोड युक्तिवादापुढे मित्र वकील माघार घेतो
व जज साहेब हीरो वकिलाच्या बाजूने निकाल देतात..
जज साहेबांचा निर्णय ऐकताच सा~या अमेरिकेत आनंदाचे वातावरण होते..
मुलांचे भावविश्व सुरक्षित राहते..
हीरो वकील केस जिंकतो..मित्र वकील त्याचे अभिनंदन करतो
वाचन
5072
प्रतिक्रिया
0