मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदहोश (शायरी)

शार्दुल_हातोळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हा असा बेधुंद वारा, धुंद मज जातो करुनी मग जणु होऊन गंध, येतेस तू माझ्या मनी खेळ सारा काळजाचा, जालिम हा मद्यापरि ना दिसे ते चेहऱ्यावर, पण ओढ मात्र अंतरी ना कळे मजला तुझे, हे गुढ रम्य हावभाव काय मी वर्णु तयांना, काय त्यासी देऊ नाव एवढे मज जाणवे की, तू तुझी नाहीस आता दूर का मग राहसी तू , कैफ ओसंडुन वाहता या अशा तारुण्यकाळी, हे धुंद रुप यौवनाचे का उगा करतेस मग तू, ढोंग हे परकेपणाचे हाय त्या तुझिया अदांची, काय ती जबरी नशा मी आहे कोठे उभा अन् ना मला कळते दिशा भासेन तुजला रांगडा मी, अन् प्रेमही हे रांगडे पण पोटातले ओठावरीही, अन् बोलणेही रोकडे मी नव्हे मजनु कथेतील, अन् प्रेम नाही आंधळे मी जरी आहे दिवाना, ना लाचारवाणा घुटमळे प्राशुनी प्रेमामृताला, झिंगुनी मदहोश होऊ वाटुदे हेवा जगाला, बेफाम त्या मस्तीत गाऊ उसळु दे काळिज आता, ना आता पर्वा जगाची होऊ दे आपुली कहाणी, प्रेरणा भावी युगाची -शार्दुल हातोळकर

वाचन 3839 प्रतिक्रिया 0