मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुष्काळ - जिंकायाची आहे लढाई

शार्दुल_हातोळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
दुष्काळाचा पडला वेढा रूष्ट जाहले पाऊसपाणी मात्र भूमीच्या राजपुत्रा तू नकोस राहु खचल्यावाणी दुर्दैवाने आजघडीला आभाळाचा रोष इथे जिथे डोलली हिरवी राने उजाड आता शेत तिथे जिंकायाची आहे लढाई आपणास ही आज पुन्हा दुर्भाग्याचे जरी उन्हाळे तरी न भितो आम्ही उन्हा जरी कोपली अवघी सृष्टि समस्त बांधव तुझ्यासवे लाख हातांनी लढत राहु घडवाया सुखस्वप्न नवे संपुन जातील दिवस हेही इथे बरसतील पाऊसधारा पुनश्च येईल जुनी सुबत्ता दुःखाला ना उरेल थारा नकोच ओझे उपकारांचे हिमतीने अन् जाऊ पुढे अशी घेऊया गगनभरारी गरुडाचीही फिकी पडे विसरुन जाऊ निराशवाटा प्रगतीच्या त्या घडवु पथा आता दाखवु अवघ्या विश्वा ही बळीराजाची जिद्दकथा - शार्दुल हातोळकर

वाचन 2069 प्रतिक्रिया 0