मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मन दुणे मन

नीलमोहर · · दिवाळी अंक
. . मन चिमणं पाखरु, उंच आभाळासी जाई. मन पिंजऱ्यातील पक्षी, बंध तोडूही न पाही. मन ग्रीष्मासम तप्त, शिशिर गारवा मनात. वर्षाधारा संतत बरसत, ऋतु बदलती क्षणात. खोल मनाचिया डोही, तळ कसा तो गाठावा. चिरंतनाचे गूढ मनी, शोध कधी न लागावा. दूरवर पल्याड मनाचिये गाव, ठाव तयाचा लागता न लागे. शोध घेऊनी शिणला जीव, कुठवर धावावे त्याचिया मागे. मन उभे ऐलतीरी, मन पैलतीरासी जाई. मना ओढ किनाऱ्याची नाव भरकटत राही. मनाचिये गुंती, अडकतो जीव. तुटता तुटेना,सुटता सुटेना, घट्ट बांधियेली वीण. - नीलमोहर. . 1 . .

वाचन 7397 प्रतिक्रिया 0