मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा गाव

लवंगी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मनकोन्यात दडलय गाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| माडांच्या पानात सुरुच्या रानात वार्‍याची गाणी घुमती कानात देवळाच्या घंटेत श्रद्धाभाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| पाउलवाटेवर धुळीशी कुस्ती बैलगाडीतील मित्रांशी मस्ती पावसाच्या सरीत भिजलाय गाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| चमचमत्या वाळूत ओलीशी पावल आबांच्या राईत आभाळ मावल आजीची हाक घेते काळजाचा ठाव सागरलाटांवर डुलतेय नाव||

वाचन 3449 प्रतिक्रिया 0