मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ती

शीतल जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ती धरित्री ती जीवन दायिनी ती शक्ती ती भक्ती ती विद्या ती प्रज्ञा ती अर्धागिनी, ती कन्या ती वीज , ती नीज ती काळजी , ती प्रीत ती प्रेरणा , ती ज्योत ती ममता, मायेच स्त्रोत ती हळवी, अन तरी ती खंबीर हि ती मृदू , तरी प्रसंगी ती कठोर हि तीची ओंजळ नेहमी रिक्त, तीचे जगणे कधी मनमुक्त ती पावसची रिमझिम बरसणारी धारा अन ती , कृष्णाची प्रेमवेडी राधा ती सर्व नात्या मध्ये गुंतलेली तरी स्वत्व स्वताचे जपलेली ती स्वतंत्र अन ती कणखर ती स्वताला सावरणारी , सांभाळणारी स्वतची काळजी स्वताच घेणारी मला, अभिमान आहे मी "ती" असल्याचा प्रत्येक दिवस माझ्या साठी स्व-सन्मानाचा अपेक्षा तर काहीच नाही कुणाकडून स्त्री म्हणून सन्मान अन माणूस म्हणून आदर दाखवा हीच आशा आहे समाजाकडून मला अभिमान आहे , मी स्त्री असल्याचा आणि हा अभिमान माझ्या आई वडिलांना पण आहे Save a girl Child -शीतल --

वाचन 1335 प्रतिक्रिया 0