काही अपेक्षा.... मिपाकरांकडून
खुलासा-
हे विचार आम्ही धोंडोपंत आपटे या एका मिपाकराच्या भूमिकेतून मांडत आहोत. आमच्या मिसळपाव डॉट कॉमच्या मॉडरेटर पदाचा या विचारांशी काहीही संबंध नाही. मिपाच्या संपादक मंडळाला हे विचार पटतील किंवा पटणारही नाहीत.
सध्या मिपाच्या संपादक मंडळाची एसटी इतकी खचाखच भरलेली आहे की, काहींना त्यात बसायला देखील जागा नाही. असो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट संपादक मंडळातील काहींना पटणे आणि काहींना न पटणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या पटण्या किंवा न पटण्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण नाही.
बरं होतं असं की , विदेशी प्रवासी आले की त्यांना जागा खाली करून द्यावी लागते. कारण इंग्लंड अमेरिकेत राहिले म्हणजे ते मोठे.... अशी एक व्याख्या सर्वत्र रूढ झालेली आहे.
आम्ही आपले कोकणातले साधेसुधे लोक. टमरेल घेऊन पोफळीखाली बसतो. पण या परदेशस्थांना वातानुकूलित शौचकूप लागते. त्यामुळे सहाजिकच परदेशस्थ लोकांचा सर्वत्र दबदबा असतो.
आपल्या सायटीच्या संपादकात अशा उच्चभ्रू परदेशस्थांचा भरणा असावा अशी अनेक साईटवाल्या मालकांची इच्छा असते. कारण त्यांच्या मताला किंमत जास्त अशी परिस्थिती मराठीच नव्हे तर इतर भारतीय भाषातील संकेतस्थळावर आहे. असो.
तर सांगण्याचा मुद्दा एवढाचं की खाली लिहिलेले विचार ही आमची वैयक्तिक पातळीवरची मते आहेत.
आमच्या असे पाहण्यात आले आहे की, अनेक उपटसुंभ इतर संकेतस्थळांवर प्रथम लेखन करून नंतर त्या ताटातले खरकटे लोकप्रियता मिळविण्यासाठी मिपावर टाकतात.
कोणी कुठे लेखन करावं हा लोकशाही स्वातंत्र्याचा भाग आहे असे आम्ही देखिल मानतो. पण जेव्हा पूर्वप्रसिद्धीचे संदर्भ दिले जातात त्यात मिपाची विलक्षण अवहेलना होते हे नक्की.
कारण इतर ठिकाणी आधी लेखन प्रसिद्ध करायचं आणि ते तिथे प्रसिद्ध झाले आहे हे तारे इथे तोडायचे हा भिकारचोटपणा आहे. म्हणजे " हे पहा किती चांगलं आहे? आधी तिथेसुद्धा प्रसिद्ध झालाय..... " असे त्यातून सुचवून प्रसिद्धी इथे मिळवायची हा उद्देश चीड आणणारा आहे.
मिपा हे उगवत्या प्रतिभेला वाव देणारं संकेतस्थळ म्हणून नावारूपाला आलेले आम्हाला आवडेल.
इतर ठिकाणी पाडलेल्या साहित्याचा जिर्णोद्धार करण्याचे हे ठिकाण ठरू नये हीच अपेक्षा.
आपला,
(स्पष्ट) धोंडोपंत
वर जे लिहिले आहे ते पोटतिडकीने लिहिले आहे हे सांगायला नकोच. त्याचा स्तोत या संकेतस्थळाबद्दल आमच्या मनात असलेले प्रेम हा आहे , हे सुज्ञास समजेल अशी अपेक्षा आहे. काही त्रस्त संमंधांची कोल्हेकुई गृहीत धरली आहे.
वरील विचार किंवा त्यात आलेले शब्द संपादक मंडळाच्या माननीय, वंदनीय, आदरणीय, पूजनीय, प्रातःस्मरणीय अमेरिकन संपादकांना जर अश्लील, ग्राम्य , असंस्कृत वाटले तर हा संपूर्ण लेखच्या लेख उडविण्याची कृपा करावी ही विनंती.
आपला,
(स्पष्टवक्ता) धोंडोपंत
वाचन
14363
प्रतिक्रिया
0