महाराष्ट्र"विलास"
नारायण राणे तसेच वृत्तपत्रीय विश्लेषणातून कालपर्यंत असे ऐकून होतो की अशोक चव्हाण जरी नवीन मुख्यमंत्री म्हणून "बसवले" असले तरी रीमोट कंट्रोल अजूनही विलासरावांच्या हातातच आहे. आज त्याची खात्री पटली. महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळ अजुनही विलासराव देशमुख हेच जनतेचे लाडके नेतृत्व आहे असे मानते... अथवा अनाभिषिक्त राजा असे मानत असावे...
त्याहूनही गंमत म्हणजे म.टा. तील बातमी प्रमाणे, chiefminister@maharashtra.gov.in हा इ-मेल पत्ता न वापरता नवीन मुख्यमंत्री अधिकृत पत्ता म्हणून ashokchavanmind@rediffmail.com असा पत्ता वापरणार आहेत! याचा अर्थ त्यांना त्यांच्या इमेलवर कोणी नजर ठेवेल अशी भिती वाटते का? अर्थात त्याला हे असे उत्तर योग्य आहे का हा अजून एक वादाचा मुद्दा आहे.
पण तरी देखील अशोक चव्हाणांनी इ-मेल पत्ता दिला आहे, त्याचा वापर करून सर्वांनी नक्कीच संपर्क साधला पाहीजे असे वाटते.
वाचन
2467
प्रतिक्रिया
0