मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिषेक प्रकारांची माहिती हवी

माहितगार · · काथ्याकूट
काल आणि आज मिळून मराठी विकिपीडियावर शिखर शिंगणापूर हा लेख अद्ययावत करण्याचा योग आला तसेच त्या सोबतकावड यात्रा नावाचा नवा लेखही बनवला. पण लेखांना दुवा देताना लक्षात आले की 'अभिषेक' या विषयावर मराठी विकिपीडियावर लेख अद्यापतरी उपलब्ध नाही. आणि इंग्रजी विकिपीडियावरील लेखातही सध्या हिंदू धर्मातील अभिषेकांपेक्षा तांत्रिक बुद्धीझम वगैरेंच्या अभिषेकांची माहिती मिळते पण सर्व प्रकारच्या अभिषेकांबद्दल पुरेशी माहिती दिसत नाही. सध्या चतुर्मास चालूच आहे तर त्या निमीत्ताने अभिषेक विवीध प्रकारांची नोंद या धागा लेखाच्या माध्यमातून घेता आली तर विकिपीडियावर एका ज्ञानकोशीय लेखाची चांगली भर पडू शकेल. (या धागा लेखास आलेल्या प्रतिसादांचा उपयोग होऊन अभिषेक हा लेख बनवणे सोपे गेले आहे. प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद) १) अभिषेक म्हणजे काय ? २) अभिषेकांचे प्रकार कोणते ? ३) उद्दिष्टे आणि साध्ये कोणती ? ४) कोणते अभिषेक कोण-कोणत्या देवतांना कोणकोणत्या मंदिरात केव्हा केव्हा केले जातात ? ५) दुर्मीळ अभिषेकांचे प्रकार कोणते ? ६) कोणत्या अभिषेकांचे उल्लेख कोणत्या ग्रंथात मिळतात ७) कोणत्या अभिषेकांना कोणते मंत्र म्हटले जातात ? ८) जैन धर्मीयातही अभिषेक असतात का ? असेल तर प्रकार आणि पद्धती कशा असतात ? * आपल्याकडे स्वतःकाढलेली अभिषेकाची काही छायाचित्रे असल्यास विकिमिडीया कॉमन्स वर प्रताधिकारमुक्त स्वरूपात चढवल्यास विवीध भाषी विकिपीडिया प्रकल्पातून अशी छायाचित्रे वापरता येतील. * ह्या धागा लेखाचा उद्देश विकिपीडियासाठी माहिती संकलीत करणे असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त समजले जातील. * अनुषंगीक सोडून इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी आभार.

वाचन 31247 प्रतिक्रिया 0