मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शष्पचिंतन

निराकार गाढव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी ! आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे || भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ? धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि || जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे | पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ? मनात ढेकूण ठेवा लपवून घट्टच ढाकण दाबुनिया | ऐकुया संगीत राहुया धुंदीत जीवन रंगीत पेल्यासम || फेका ती खड्ड्यात गंजली हत्यारं रंगवुनि मृत वाघनखं | जळो इतिहास होऊदेत र्‍हास कुणास पत्रास समष्टीची || सुकून चालली झाडं, पानं, फूलं; खरडून शब्द काय मिळे ? मनाशी वादळ, मनात कल्लोळ; सुचेना विचार काही केल्या || बळीयांचा जेठ येऊद्याहो थेट उराउरी भेट रासभाशी || || जय गुरुदेव ||

वाचन 5453 प्रतिक्रिया 0